राज्यपालांचे वाहनचालक मोहनसिंग बिश्त यांचे आकस्मिक निधन

राज्यपालांचे वाहनचालक मोहनसिंग रामसिंग बिश्त यांचे आज (शुक्र. २७) अल्प आजाराने आकस्मिक निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ५० वर्षे होते. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन कर्मचारी संकुलातील त्यांच्या निवासस्थानी जाऊन पार्थिवाचे दर्शन घेतले तसेच बिश्त कुटुंबियांचे सांत्वन केले. गेली २५ वर्षे राजभवन येथे वाहनचालक म्हणून कार्यरत असलेल्या बिश्त यांनी राज्यपाल एस. सी. जमीर, के. शंकरनारायणन, सीएच. विद्यासागर राव तसेच विद्यमान राज्यपालांच्या वाहनाचे सारथ्य केले होते.
बिश्त यांच्या मागे पत्नी तसेच शिक्षण घेत असलेली दोन मुले आहेत. मनमिळावु स्वभावाच्या मोहनसिंग बिश्त यांच्या निधनामुळे राजभवन कर्मचारी वर्गात हळहळ व्यक्त होत आहे.