अखेर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुलाचा हट्ट पवारांनी पुरवला : नगरची जागा दिली सुजयला !!

अहमद नगर दक्षिणेचा काँग्रेस-राष्ट्रवादीचा जागेचा तिढा सुटला असून शरद पवार यांनी आपल्या ताब्यातील जागा राधाकृष्ण विखेपाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांना सोडली आहे. अकलूज येथे विजयसिंह मोहितेपाटील यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना स्वतः शरद पवार यांनी दिली.हि जागा चर्चेतून सुजय विखे यांना मिळाली नसती तर सुजय विखे यांनी बंडखोरीची तयारी केली होती. राधाकृष्ण विखेपाटील यांनीही” शरद पवार मला वडिलांसारखे असून सुजय त्यांच्या नातूसारखा असल्याने नगर दक्षिणची जागा त्याला द्यावी म्हणून आग्रही होते. याच कारणावरून ते काँग्रेस पक्ष सोडणार अशाही बातम्या होत्या. गेल्या तीन वर्षां पासून या निवडणुकीच्या तयारीत सुजय यात यारीत होते. भाजपचे नेते गिरीश बापट यांनी सुजय विखे भाजपात येत असतील आणि तिकीटाची मागणी करीत असतील तर भाजपची तयारी आहे असे वक्तव्य केले होते. मुख्यमंत्र्यांनीही काँग्रेसवर टीका करताना “आधी आपले घर सांभाळा” असा टोला दिला होता. अखेर राधाकृष्ण विखेपाटील मुलासाठी जागा मिळविण्याच्या रणनीतीत यशस्वी झाले आहेत.