Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : शेख मुश्ताक याच्याविरूध्द आणखी एक गुन्हा दाखल , बनावट कागदपत्रे आधारे जामीन प्रकरण

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंंंगाबाद : न्यायालयात बनावट कागदपत्रे सादर करून जामीन घेणा-या टोळीचा मास्टर मार्इंड शेख मुश्ताक याच्याविरूध्द आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख मुश्ताक व त्याच्या साथीदारांनी गंगापूर न्यायालयात बनावट कागदपत्रे सादर करून जामीन घेतला होता.
बनावट आधारकार्ड, बनावट मतदान ओळखपत्र, बनावट सॉल्वन्सी प्रमाणपत्र तयार करून जामीन घेणा-या टोळीच्या मुसक्या गेल्या महिन्यात गुन्हे शाखा पोलिसांनी आवळल्या आहेत. या टोळीचा मास्टर मार्इंड असलेल्या शेख मुश्ताक व त्याच्या साथीदारांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे अनेकांचे जामीन घेतला असल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान, २० सप्टेंबर २०१९ रोजी शेख मुश्ताक शेख मुनाफ, टेलसिंह नवाबसिंह यादव व एका महिलेने गंगापूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिका-यासमोर बनावट कागदपत्रे सादर करून आरोपीचा जामीन घेतला होता.
याप्रकरणी गुन्हे शाखेचे जमादार प्रकाश चव्हाण (वय ४१) यांनी दिलेल्या तक्रारीवरून शेख मुश्ताक याच्यासह तीन साथीदाराविरूध्द बेगमपुरा पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा तपास करंत आहे

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!