लहान मुलांची लग्न झाली , माझे का करीत नाही म्हणून त्याने आईच्या डोक्यावर केले कुऱ्हाडीचे वार !!

लहान मुलांची लग्न होतात माझं का नाही, असे म्हणत मुलानेच आपल्या आईच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन तिचा खून केल्याची घटना साताऱ्यातील मोराळे गावात गुरुवारी ही घटना घडलीहे. खून करणारा मुलगा किरण शिंदे २८ याला वडूज पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी किरण शिंदे रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घरी आला आणि आई कांताबाई शिंदे हिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. माझ्यापेक्षाही लहान मुलांची लग्न झाली, पण माझं लग्न का करत नाही असा प्रश्न विचारत किरण शिंदे आईला शिवीगाळ करु लागला. यावेळी त्याने दरवाजाला कडी लावून घेतली आणि कुऱ्हाडीने वार करत निर्घृण हत्या केली.
गोंधळ ऐकून किरण शिंदेचे वडील शहाजी शिंदे यांनी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. पण दरवाजा तोडला तुमचाही खून करेन अशी धमकी आरोपीने देली. शहाजी शिंदे यांनी तात्काळ वडूज पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी गांभीर्य ओळखत तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली.