रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कोणताही बदल केला नाही , पतधोरण जाहीर , शेअर बाजाराला मोठा फटका , महागाई वाढण्याचे संकेत

Governor, Reserve Bank of India’s Press Conference
https://t.co/SRY7zf7JG9— ReserveBankOfIndia (@RBI) December 5, 2019
गुंतवणूकदार आणि उद्योजकांचे लक्ष लागलेले पतधोरण आज दुपारी आरबीआय जाहीर केले. देशाच्या अर्थव्यवस्थेवरून सर्वत्र चर्चा चालू असतानाच अर्थव्यवस्था रिझर्व्ह बँकेनं जाहीर केलेल्या पतधोरणामुळे आणखी एक दणका बसला आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेट ५.१५ टक्के इतका कायम ठेवला आहे. त्यात कपात केली जाईल असं म्हटलं जात होतं मात्र तसं झालं नाही. तसेच रिव्हर्स रेपो रेट ४.९० टक्के इतका राहिला. आरबीआयने रेपो रेटमध्ये कपात न केल्यामुळे त्याचा जबरदस्त फटका शेअर मार्केटला बसला आहे. सकाळी सेन्सेक्स सुमारे ४१ हजारांवर पोहोचला होता. मात्र, आरबीआयने पतधोरण जाहीर करताच तो २०० अंकानी खाली आला. तुम्ही कर्जदार असाल किंवा नवीन कर्ज घेण्याच्या तयारीत असाल तर कमी व्याजदरासाठी तुम्हाला आणखी काही वेळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण रिझर्व्ह बॅंकेने गुरुवारी जाहीर केलेल्या पतधोरणात कोणताही बदल केला नाही.
आरबीआयने घोषित केल्यानुसार रेपो दर ५. १५ टक्क्यांवर स्थिर राहणार असून विकासदराचा अंदाज ६.१ टक्क्यावरून ५. १५ टक्के केला असल्याने नजीकच्या काळात महागाई वाढणार, महागाईचा दर ५. १ टक्के राहील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्षातील पाचवे पतधोरण जाहीर केले . यामध्ये दुसऱ्या तिमाहीत विकास दर पाच टक्क्यांहून खाली घसरला होता. तसेच महागाई दर वाढल्याने रेपो रेट कमी केला जाईल असं म्हटलं जात होतं. आतापर्यंत सलग पाचवेळा रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली होती. यावेळी मात्र कपात न करता रेपो रेट जैसे थे ठेवण्यात आला. देशाच्या जीडीपीचा २०१९-२० या आर्थिक वर्षात ६.१ टक्के इतका जाईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण तो कमी करून आरबीआयने ५ टक्के इतका केला आहे. याआधी ऑक्टोबर महिन्यात जीडीपी अंदाज ६.१ टक्के होण्याची शक्यता व्यक्त केली होती.
रिझर्व्ह बँकेने बँकेचा रेपो दर ५.१५ टक्के स्थिर ठेवला आहे. सलग पाचवेळा बँकेने रेपो दरात कपात केली होती. मात्र बँकांनी व्याजदर कपातीला फारसा प्रतिसाद दिला नाही. पतधोरणातील व्याजदर स्थिर राहिल्याने गृह, वाहन आणि इतर कर्जांचे दर कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान विकासदराबाबत चिंता व्यक्त करताना आरबीआयने यापुढे व्याजदर कपातीस संधी असल्याचे संकेत दिले आहेत.
कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती मोजण्याचे एक परिमाण जीडीपी हे आहे. जीडीपी म्हणजे एखाद्या देशाने त्या वर्षी देशांतर्गत उत्पादन केलेल्या वस्तू आणि सेवांची एकत्रित किंमत होय. जेव्हा आपल्याला वेगवेगळ्या देशांच्या आर्थिक स्थितीची तुलना करायची असते तेव्हा जीडीपीचा वापर केला जातो. तसेच देशांतर्गत गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी उत्पादन किती वाढले, हे मोजण्यासाठीही जीडीपीच्या दराचा वापर होतो.
देशाचा आर्थिक विकास दर प्रचंड खाली आला आहे. गेल्या सहानंतर पहिल्यांदा या शेटच्या तिमाहीत विकासदर ४.५ टक्क्यांवर पोहोचला आहे. विकास दरामध्ये झालेला घट बघता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) रेपो रेट कमी करेल जेणेकरुन कर्ज घेणाऱ्यांचे व्याजदर कमी होईल, अशी आशा वर्तवली जात होती. मात्र आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणतीही बदल केलेला नाही. रेपो रेट कपात न करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे. त्यामुळे रेपो रेट हा ५.१५ टक्क्यांवरच राहिला आहे. याशिवाय आरबीआयने रिव्हर्स रेपो रेटमध्येही बदल केलेला नाही. रिव्हर्स रेपो रेट आतापर्यंत ४.९० टक्के इतका होता. तो तितकाच राहणार आहे.