उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या दोन दिवसीय अधिवेशनाची सांगता , येत्या दोन दिवसात खातेवाटप , राज्याच्या आर्थिक स्थितीचा मागवला अहवाल

Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray: Leaders of the three parties (Shiv Sena-NCP-Congress) will hold a meeting to discuss allocation of portfolios. Allocation for the 6 ministers will be done as soon as possible. Further allocations will also be done soon. https://t.co/20gdlDEmrA
— ANI (@ANI) December 1, 2019
गेल्या चार दिवसात राज्यात सत्तांतराच्या गतिमान घडामोडी घडल्या. यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी औट घटकेसाठी घेतलेली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदासाठी घेतलेली शपथ , स्वगृही गेलेले अजित पवार , बहुमत सिद्ध होत नाही म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला मुख्यमंत्रीपदाचा दिलेला राजीनामा आणि त्यानंतर मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेताच उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. शेतकऱ्यांना आतापर्यंत किती मदत देण्यात आली याची माहिती मागवतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीचा अहवाल मागितला आहे. राज्याची आर्थिक स्थिती काय आहे? याचा लेखाजोखा सादर करण्याचे आदेशच ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पहिल्या दिन दिवसीय हंगामी अधिवेशनाची आज सांगता झाली असून विधानसभेचे कामकाज अध्यक्षांनी १६ डिसेंबरपर्यंत तहकूब केले आहे. राज्याला आर्थिक मदत मिळावी म्हणून उद्धव ठाकरे लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.
विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आरेतील मेट्रो कारशेडच्या बांधकामास स्थगिती देण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आता आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. विकास आणि पर्यावरण हे दोन्हीही सोबत असले पाहिजे, अशी आपली भूमिका असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आपण कोणत्याही विकास कामाच्या विरोधात नसून विकास कामांना स्थगिती दिली नाही. मेट्रोचे काम सुरू असून फक्त कारशेडच्या बांधकामास स्थगिती दिली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
राज्यात महाविकास आघडीचे नवे सरकार आल्यानंतर विधानसभेचे अधिवेशन संपले आहे. विश्वासदर्शक ठराव, विधानसभा अध्यक्ष निवड, विरोधी पक्षनेता निवड, राज्यपालांचे अभिभाषण आदी सोपस्कार पार पडले आहेत. त्यामुळे आता सरकार अधिक वेगाने काम करणार असल्याची माहिती उद्धव यांनी दिली. आगामी एक-दोन दिवसात खाते वाटप करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. सध्या मंत्रिमंडळातील आम्ही सातही मंत्री एकत्र काम करत असून निर्णय त्वरीत घेतले जात असल्याची माहिती उद्धव यांनी दिली.