NewsUpdates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या

NewsUpdates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या
१. पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारताचे पायलट अभिनंदन उद्या वाघा सीमेवरून मायदेशात दाखल होणार, वेळ अद्याप स्पष्ट नाही
२. भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांची उद्या सकाळी सुटका करणार, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची संसदेत घोषणा
३. दिल्लीः भारताचा एक ‘पायलट प्रोजेक्ट’ यशस्वी झाला, विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सूचक वक्तव्य
४. सीमावर्ती भागात गोळीबार चालूच , पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, सुंदरबनी, मानकोट, देगवर आणि खारी करमारा सेक्टरमध्ये दुपारी तीन वाजेपासून पाकचा पुन्हा गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा
५. अहमदनगर: कर्जबाजारीपणाला कंटाळून कर्जत तालुक्यातील रजपुतवाडी येथील शेतकरी लक्ष्मणसिंग परदेशी यांची गळफास घेऊन आत्महत्या
६. अहमदनगर: शिर्डीच्या साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावरही हाय अलर्ट जरी, वाहन तसेच प्रवाशांची कसून तपासणी
७. भारत-पाकमधील तणावावरील नवज्योतसिंग सिद्धू यांचे वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. ती पक्षाची भूमिका नाही, काँग्रेस प्रवक्ते मनिष तिवारी यांचे स्पष्टीकरण
८. जर्मनी, दक्षिण आफ्रिका आणि बेल्जियमसह १० देशांच्या उच्च अधिकाऱ्यांसोबत भारताच्या परराष्ट्र सचिवांची बैठक. भारत-पाकमधील सध्य स्थितीची माहिती दिली
९. मुंबई: संजय बर्वे यांनी पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला, मुंबईकरांनी घाबरू नये, केवळ सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करावे – संजय बर्वे, पोलीस आयुक्त
१०. आमदार प्रशांत परिचारक यांचं निलंबन मागे, सैनिकांच्या पत्नीबद्दल केलं होतं आक्षेपार्ह विधान
११. भारताने पाकिस्तानसोबत चर्चेची संधी सोडू नये, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
१२. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे आयोजित होणाऱ्या दहावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात
१३. ठाणे – शरीर सुखाची मागणी करणाऱ्या केडीएमसीच्या लिपिकास एसीबीने केली अटक
१४. जळगाव : व्हिडिओकॉल करून बोदवड येथील महिलेशी अश्लील वर्तन करणाऱ्या पुणे येथील संदीप सीताराम कांबळे (३०) या तरुणाला जळगाव पोलिसांकडून अटक
१५. औरंगाबाद : सिल्लोड नगर पालिका काँग्रेसच्या ताब्यात: नागरध्यक्षपदी राजश्री निकम : त्यांनी भाजपच्या अशोक तायडे यांचा ११ हजार मतांनी पराभव केला.२६पैकी भाजपला फक्त दोन जागा मिळाल्या आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मतदारसंघातील ही निवडणूक चांगलीच प्रतिष्टेची झाली होती, मात्र काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आपला मतदारसंघ सुरक्षित ठेवण्यात यश मिळविले.