शबाना आझमी यांच्या आई शौकत आपा यांचे निधन

सिने अभिनेत्री शबाना आझमी यांच्या मातोश्री आणि प्रसिद्ध ऊर्दू शायर कैफी आझमी यांच्या पत्नी शौकत कैफी यांचं आज संध्याकाळी जुहू येथील निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झालं. त्या ९१ वर्षाच्या होत्या. शौकत कैफी या जुन्या जमान्यातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. ‘उमराव जान’, ‘बाजार’ आणि ‘हीर रांझा’ सारख्या गाजलेल्या सिनेमातील त्यांच्या भूमिका अविस्मरणीय ठरल्या होत्या.
कैफी आझमी वेलफेयर सोसायटीचे उपव्यवस्थापक आशूतोष यांनी याबाबत नाइटी देताना सांगितले कि , शौकत कैफी या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. वयोमानामुळे त्या उपचाराला प्रतिसादही देत नव्हत्या. आज सायंकाळी त्यांनी जुहू येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा दफनविधी मुंबईतच होणार आहे.
शौकत कैफी या जुन्या काळ्यातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यांना शौकत आपा म्हणूनही ओळखलं जायचं. त्यानी ‘गरम हवा’, ‘उमराव जान’, ‘बाजार’ आणि ‘हीर रांझा’ आदी सिनेमांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. २००२मध्ये आलेला ‘साथिया’ हा त्यांचा शेवटचा सिनेमा होता. हैदराबादमध्ये जन्मलेल्या शौकत कैफी यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवल्यानंतर मुंबईतच बस्तान बसवलं होतं. कैफी आझमी यांच्या जीवनावर त्यांनी ‘कैफी आणि मी’ हे पुस्तक नुकतच प्रसिद्ध केलं होतं. कैफी आजमी आणि त्या दोघंही भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होते. दोघेही भाकपच्या इप्टा या सांस्कृतिक चळवळीत कार्यरत होते. शौकत कैफी यांच्या निधानामुळे चित्रपटसृष्टीत शोक व्यक्त करण्यात येत आहे.