Aurangabad Crime : दौलताबाद पोलिसांनी जप्त केला चोरीला गेलेला माल , तीन चोरट्यांना तत्काळ अटक

दौलताबाद पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या चोरट्यांकडून दोन लाख पाच हजार सहाशे रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात यश मिळविले .
या प्रकरणात नवनाथ बकले , वय ३८ , सुरक्षा कर्मचारी , श्रीराम फायनान्स ऑटोमोबाईल यांनी तक्रार दिली की होती कि , दि. १६ नोव्हेंबर २०१९ रोजी २३०० ते सकाळी ८ वाजता ते कर्तव्यावर असताना सकाळी ४ वाजेच्या सुमारास कोणीतरी चोरट्याने त्यांच्या आवारात ठेवलेले ट्रक टायर, छोटा हत्ती चे ५ टायर , टेप रेकॉर्डर, बॅटरी असा एकूण १, ०५, ६०० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. या प्रकरणी पोलिसांनी भादंवि . ३८९ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणात दौलताबाद पोलिसांनी तात्काळ तपास करून गुन्ह्यातील अटक आरोपींची 1)दत्तात्रय अशोक जाधव राहणार मिटमिटा 2)राहुल अनुष घोडेकर राहणार देवगिरी वेली 3)सुनील सुभाष दुबले राहणार मिटमिटा यांच्या ताब्यातून टाइमिंग ट्रक टायर, छोटा हत्ती टाटा एस चे टायर, म्युझिक सिस्टिम , ओमिनी स्टार्ट स्विच सह इतर ऐवज आणि ओमिनी गाडी असा एकूण दोन लाख पाच हजार सहाशे रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला