Aurangabad Crime : शहरात वाहनचोरट्यांचा धुमाकुळ, ट्रकसह दोन दुचाकी लंपास

औरंंंगाबाद : शहरात गेल्या काही दिवसापासून वाहन चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. वाहन चोरट्यांनी शहराच्या विविध भागातून एका ट्रकसह दोन दुचाकी लंपास केल्या आहेत. वाढत्या वाहनचोNयामुळे वाहनधारक त्रस्त झाले असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वाहनधारकांतून करण्यात येत आहे.
दिनकर त्र्यंबक मुंढे (वय ५४, रा. जाधववाडी) यांचीr दुचाकी क्रमांक (एमएच-२०-डीबी-६४४४) घरा समोर उभी केली असता चोरट्याने ती लंपास केली. प्रकरणात हर्सुल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसNया घटनेत, सुरेश भिवसन लहासे (रा. आन्वापाडा, ता. भोकरदन) हे १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी कामानिमीत्त दुचाकीवर क्रमांक (एमएच-२१-एसी-०७०५) किराणा चावडी येथे आले होते. तेंव्हा त्यांची दुचाकी चोरट्याने लंपास केली. प्रकरणात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तिसNया घटनेत रस्त्याच्याकडेला उभा केलेला हायवा ट्रक क्रमांक (एमएच-२३-एयू-०४५५) चोरट्याने लंपास केला. प्रकरणात लक्ष्मण अर्जुन खरात (वय ४२, इंदीरा नगर, गारखेडा) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.