Aurangabad Crime : खुनाचा प्रयत्न करून फरार झालेला आरोपी अटकेत

औरंगाबाद – गंभीर दुखापत आणि खुनाचा प्रयत्न करणार्या फरार आरोपीला जिन्सी पोलिसांनी शनिवारी सकाळी बारी काॅलनीतून त्याच्या राहत्या घरातून अटक केली.चार गंभीर गुन्ह्यात तो जिन्सी पोलिसांना हवा हौता.
मो.इम्रान एम.ए. लतीफ (२०) असे अटक आरोपीचे नाव आहे. मो. इम्रान हा अल्पवयीन असल्यापासून जिन्सी परिसरात गेल्या चार ते पाच वर्षांपासून लहान सहान कारणावरुन तलवार घेऊन दहशत पसरवत होता.त्यावेळी प्रकरणात पोलिसांना मो.इम्रानला अनेकवेळा ताब्यात घेऊन सोडावे लागले होते. ईम्रान ला नशेच्या गोळ्या घेण्याचा भयंकर नाद असून या नशेत त्याने अनेक वेळा अनेकांवर चाकू हल्ला केल्याची नोंद जिन्सी पोलिस ठाण्यात आहे. पाहिजे असलेल्या चार गुन्ह्या पैकी गेल्या नोव्हेंबर २०१८ मधे मो.इम्रान ने किराडपुर्यात चहाचे बील न देण्याकरता हाॅटेल चालक वसीम साहेब खान(२८) याच्या मानेवर तलवारीने वार करुन फरार झाला हौता. तर तब्बल वर्षभरानंतर १४नोव्हेंबर ला रोशनगेट परिसरातील सुतगिरणीच्या मोकळ्या पटांगणात समद अमीर कुरेशी(३०) या मटणविक्रेत्याला मोटरसायकलचा हेडलाईट तोंडावर चमकावतो म्हणून समद कुरेशीच्या मांडीवर चाकूने वार केले. या दोन्ही व अन्य दोन प्रकरणात पोलिस इम्रान चा शोध घेत असतांना पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांना खबर्याने मो.इम्रान घरी आल्याची माहिती दिली.तो झोपेत असतांनाच पीएसआय दत्ता शेळके यांनी केंद्रे यांच्या आदेशावरुन मो. इम्रान ला बेड्या ठोकल्या. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दत्ता शेळके करंत आहेत.