Aurangabad : गुन्हा दाखल होण्यापूर्वी सायबर पोलीस ठाण्याने मिळवून दिले १९ लाख रुपये

शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांनी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच घाबरुन किंवा गोंधळून न जाता थेट आपल्याशी संपर्क करावा.
कैलास देशमाने,
पोलिस निरीक्षक सायबर पोलिस ठाणे औरंगाबाद
९०११०७१७८१
- जगदीश कस्तुरे
औरंगाबाद : जानेवारी २०१९ ते आॅक्टोबर २०१९ या काळात टेलि फिशिंग किंवा आॅनलाईन गंडा घालणार्या भामट्यांनी ओटीपी किंवा क्रेडिट आणि डेबिट कार्ड वरचे नंबर विचारुन नागरिकांची रक्कम हडप केल्या प्रकरणी तक्रारदारांचे १९ लाख रु. परत मिळवून देण्याचे अवघड काम केले आहे . ही किमया पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याने पार पाडली.
या प्रकरणांमधे नागरिकांनी फसवले गेल्याचे लक्षात येताच काही तासात सायबर पोलिसांची संपर्क साधला तर भामट्यांनी हडप केलेली रक्कम पोलिसआयुक्तांकडून बॅंकांना निर्देश देऊन जप्त केले जातात.या प्रकरणात नाव न छापण्याच्या अटीवर काही नागरिकांनी “महानायक” शी संवाद साधला. ज्या नागरिकांची रक्कम मिळाली त्यांनी पोलिसआयुक्त चिरंजीव प्रसाद आणि पोलिस निरीक्षक कैलास देशमाने यांचे भरभरुन कौतूक केले. यापूर्वी अनेक वर्षांपासूनआॅनलाईन गंडा घातलेल्या नागरिकांनाही सायबर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास पुढाकार घेतला आहे.
पोलिस निरीक्षक कैलास देशमाने यांना सुरवातीला काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी फिर्यादींच्या बॅंक खात्यातून लंपास केलेली रक्कम सीझ करण्यासाठी बॅंकांशी अधिकृत संपर्क साधण्याकरता पोलिस आयुक्तांची परवानगी घेतली व बॅंकांना तोंडी व लेखी निर्देश देण्यास सुरुवात केली. या मधे जानेवारी २०१९ पासून अनुक्रमे ४५ हजार ९००, ३लाख ६६ हजार, १लाख ५७ हजार! ३०हजार,१लाख ५ हजार,९ लाख ६५ हजार, २ लाख ५० हजार व २ लाख ५० हजार अशा रकमा फिर्यादींना वापस करण्यात सायबर पोलिस ठाण्याला यश आले आहे. या सर्व कारवायांमधे सायबर पोलिस ठाण्याचे प्रशांत साकला, सुशांत शेळके, विवेकानंद औटी, मन्सूर शहा यांनी उत्तम कामगिरी पार पाडली.
या वेळी पोलिस निरीक्षक देशमाने यांनी सांगितले की,
नागरिकांनी आनलाईन भामट्यांपासून सावध राहण्यासाठी आम्ही वेळोवेळी त्यांचे तंत्रज्ञ , माध्यमांमार्फत जनते पर्यंत सतत पोहोचवत असतोच.पण तरीही नागरिकांकडून चूक झाल्यास घाबरुन किंवा गोंधळून न जाता आमच्याशी संपर्क साधावा. तक्रारदारांचे पैशे भामट्याने एकाच वेळी जर पेटीएम किंवा एखाद्या खात्यात जमा केले असल्यास ते त्वरीत सीझ केले जाऊ शकतात.पण भामट्यांनी फसवल्यावर जर अनेक ठिकाणी रक्कम आॅनलाईन वळती केली असेल त्यावेळी फिर्यादीची रक्कम मिळणे कठीण होते.
वरील नागरिकांची रक्कम परत मिळाल्यानंतर एस.बी.आय.च्या अधिकार्यांनी पोलिसआयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी बॅंक अधिकार्यांना आणखी मार्गदर्शन करण्यासंदर्भात एखाद्या कार्यशाळेचे आयोजन करावे अशी विनंती पोलिस निरीक्षक देशमाने यांच्याकडे केली आहे.