Balakot : हवाई सर्जिकल स्ट्राईकनंतर … : मसूद अजहरचा भाऊ इब्राहिमचा खात्मा

पुलवामा येथील पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याला भारतानं सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तीन तळ उद्ध्वस्त केले आहेत. पाकिस्ताननं मात्र भारताचा हल्ला परतवून लावल्याचं म्हटलं आहे
भारतीय वायूसेनेच्या मिराज २००० ने पाकिस्तानातील दहशतवादी तळावर एकूण ६ बॉम्ब टाकलेः सरकारी सूत्रांची माहिती
पाकिस्तान: राष्ट्रीय सुरक्षा समितीची तातडीची बैठक; पाकिस्तान सेना, जनतेला तयार राहण्याचे आदेश
सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानमध्ये खळबळ; पाकिस्तान संसदेचे उद्या विशेष संयुक्त सत्र
सर्जिकल स्ट्राइक: जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरचा भाऊ इब्राहिम अजहरचा खात्मा, कंदाहार विमान अपहरणात होता सहभागी (एएनआय)
हा देश सुरक्षित हातांमध्ये; सर्जिकल स्ट्राइकनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वक्तव्य
दिल्ली: आज संध्याकाळी सर्वपक्षीय बैठक; परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी बोलावली बैठक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिनंदन
मुंबई: समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी विधीमंडळात पेढे वाटले
बालाकोटमधील कारवाईत ‘जैश’च्या अनेक महत्त्वाच्या दहशतवाद्यांचा खात्मा
गुजरात: कच्छ सीमेवर सुरक्षा दलाने पाकिस्तानी ड्रोन पाडले : सूत्र
हवाई दलाच्या पायलटना माझा सलाम! भारताच्या कारवाईनंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं ट्विट
भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यात ‘जैश’च्या २०० ते ३०० दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची सूत्रांची माहिती