Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Press Conference : हल्याबद्दल नेमकी काय आहे भारताची भूमिका : विदेश सचिवांची पत्रकार परिषद

Spread the love

भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट येथे केलेल्या कारवाईला केंद्र सरकारने दुजोरा दिला आहे. भारतीय हवाई दलाने कारवाई करत बालाकोटमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याची माहिती परराष्ट्र विभागाचे सचिव विजय गोखले यांनी पत्रकार परिषदेत दिले.
हवाई दलाच्या कारवाईबाबत माहिती देताना गोखले यांनी सांगितले की, ‘जैश-ए-मोहम्मद’ ही दहशतवादी संघटना भारतात आणखी आत्मघातकी हल्ले करण्याच्या तयारीत असल्याची माहिती भारतीय गुप्चचर यंत्रणांना मिळाली होती. बालाकोट परिसरात जैश-ए-मोहम्मद या संघटनेच्या विविध तळांवर त्यासाठी प्रशिक्षण सुरू असल्याची माहिती भारतालाहाती आली. त्यानंतर भारतीय हवाई दलाने ही विनालष्करी प्रतिबंधात्मक कारवाईची मोहीम हाती घेतली. मात्र ही कारवाई करत असताना कोणत्याही नागरिकाला ईजा पोहोचणार नाही, याची पुरेपूर काळजी घेण्यात आल्याचेही गोखले म्हणाले.
जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याचा मेव्हणआ मौलाना युसुफ अझहर या या प्रशिक्षण कार्यक्रमाचे नेतृत्त्व करत असल्याची माहितीही गोखले यांनी दिली. या तळांवर जहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू होते. या प्रशिक्षण कार्यक्रमात दहशतवादी, आत्मघातकी हल्लेखोर आणि विविध गटांचे प्रमुख यांचा समावेश होता.
या वेळी बोलताना १४ फेब्रुवारीला पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केलेल्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख गोखले यांनी केला. पाकिस्तानने वेळोवेळी दहशतवादाविरोधात कारवाई करू असे आश्वासन दिल्याची आठवण देत, पाकिस्तानने कोणती कारवाई केली नसल्याचे गोखले म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!