औरंगाबाद सावंगी बायपासवर अपघात, एक जण ठार तर दुसरा जखमी

औरंंंगाबाद : भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार विलास सोपान शेळके (वय ४०, रा.वुंâभेफळ) हे ठार झाले तर योगेश दादाराव शेळके (वय ३५) हे जखमी झाले. हा अपघात रविवारी (दि.६) सकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास वेंâब्रीज चौक ते सावंगी बायपास रोडवर घडला.
विलास शेळके यांचे नारेगाव परिसरात चहा-नाष्टयाचे हॉटेल आहे. रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते योगेश शेळके याच्यासोबत दुचाकीवर नारेगावकडे जात असतांना वेंâब्रीज ते सावंगी बायपास रोडवर त्यांच्या दुचाकीस भरधाव वाहनाने धडक दिली. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या एमआयडीसी सिडको पोलिसांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विलास शेळके व योगेश शेळके यांना उपचारासाठी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी विलास शेळके यांना तपासून मयत घोषीत केले.
या अपघाताची नोंद एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलिस नाईक भाुनदास खिल्लारे करीत आहेत. दरम्यान, मयत विलास शेळके यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन भाऊ, एक बहीण, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे
कर्णपुरा देवीच्या दर्शनासाठी जाणा-या पाच जणांना बसने उडवले, १५ वर्षीय बालकाचा भीषण अपघातात मृत्यू