Aurangabad Crime : मुर्त्या लहान गुन्हे महान !! अल्पवयीन मुलांकडून मोटारसायकलीसह ७ मोबाईल , लॅपटॉप जप्त

दोन अल्पवयीन चोरट्यांकडून जिन्सी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने चार मोटरसायकल ७ मोबाईल एक लॅपटाॅप जप्त केला आहे.
सेंट्रल नाक्यावर दोन तरुण चोरीच्या मोटरसायकल विक्रीसाठी घेऊन येत आहेत. अशी माहिती पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांना मिळाली होती.या माहिती वरुन पी.एस.आय.दत्ता शेळके यांनी दोन चोरट्यांना मोटरसायकल सहित ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.पोलिसांच्या चौकशीतदोन्ही चोरट्यांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता समोर आली आहे.त्यामुळे त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच चोरट्यांनी सहा गुन्ह्रांची कबुली दिली.वरील कारवाईत पोलिस कर्मचारी धनंजय पाडळकर, सुनिल जाधव, हारुण शेख यांनीही सहभाग घेतला होता.
पुढील तपास पोलिस निरीक्षक केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शेळके करंत आहेत.