News Update : अखेर भाजपची १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, १२ आमदारांचा पात्रता साफ, चंद्रकांत पाटील कोथरुड मधून…

अखेर भाजपची १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, १२ आमदारांचा पात्रता साफ, चंद्रकांत पाटील कोथरुड मधून..
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं आज आपल्या १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, दक्षिण कराडमधून अतुल भोसले यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात उतरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, तब्बल १२ विद्यमान आमदारांचा पत्ता कापण्यात आला आहे.
भाजप-शिवसेना युतीची बोलणी रखडल्यानं भाजपनं अद्याप उमेदवार यादी जाहीर केली नव्हती. मात्र, सोमवारी रात्री महायुतीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यानंतर भाजपनं आज उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. पहिल्या यादीत ५२ विद्यमान आमदारांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातूनच लढणार आहेत. तर, गिरीश बापट खासदार झाल्यामुळं रिक्त झालेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.