Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

नवी दिल्ली : ‘ब्रा’ मधून ३० लाखाचे सोने लपविणाऱ्या महिलेला कस्टम अधिकाऱ्यांनी घेतले ताब्यात

Advertisements
Advertisements
Spread the love

दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ब्रामधून ३० लाख रुपयांचे सोने आणणाऱ्या एका महिलेला कस्टम विभागाने पकडले. ही महिला मॉस्कोहून आली होती. या महिलेने ब्रामधील इलास्टिक असलेल्या जागेवर सोन्याच्या चार तारा बसवल्या होत्या. यासोबतच तिच्या इतर कपड्यांमध्ये सोन्याची ४ बिस्किटं देखील होती. सोन्याच्या तस्करी प्रकरणी महिलेला अटक करण्यात आले.

Advertisements

या महिलेने दिल्ली विमानतळावर ग्रीन चॅनल पार केल्यानंतर कस्टम अधिकाऱ्यांना तिचा संशय आलाय त्यानंतर अधिकाऱ्यांनी तिच्या सामानाची तपासणी केली. त्यानंतर हा प्रकार उघड झाला.

Advertisements
Advertisements

ब्राची व्यवस्थित तपासणी केल्यानंतर कस्टम अधिकाऱ्यांना ब्राच्या आत सोन्याच्या ४ तारा आढळल्या. या बरोबरच इतर कपड्यांमध्ये सोन्याची ६ बिस्किटेही लपवलेली आढळली. एकूण सोन्याचे वजन ७९४ ग्राम भरले. कसून तपासणी केल्यानंतर पुढील कारवाई करत कस्टम अधिकाऱ्यांनी कस्टम कायद्याच्या कलम ११० अंतर्गत सोने जप्त केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!