Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मध्य प्रदेश : हनी ट्रॅप मध्ये अडकले देशातील १३ आय ए एस आणि इतर अधिकारी !! हाय सोसायटी सेक्स रॅकेटचा पर्दापाश

Spread the love

मध्य प्रदेशातील हनी ट्रॅप रॅकेटमध्ये अजून एक मोठा खुलासा झाला आहे. या टोळीतील सदस्यांककडून आयएएस अधिकाऱ्यांची ‘टार्गेट लिस्ट’ तपास अधिकाऱ्यांच्या हाती लागली आहे. या अधिकाऱ्यांना तरुणींनी आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकलं होतं, आणि सेक्स व्हिडीओ तयार करत ब्लॅकमेल करण्याची तयारी केली होती. हनी ट्रॅप गँगच्या यादीत या अधिकाऱ्यांची नावं कोड वर्डच्या माध्यमातून नोंद करण्यात आली आहेत.

देशातील सर्वात मोठा ब्लॅकमेलिंग सेक्स स्कॅण्डल म्हटल्या जाणाऱ्या या प्रकरणात आतापर्यंत तपास यंत्रणांनी चार हजाराहून अधिक फाईल्स तयार केल्या असून अद्यापही तपास सुरु आहे. या गँगने आतापर्यंत चार राज्यातील महत्त्वाचे नेते, आयएएस अधिकारी, इंजिनिअर आणि मोठे व्यापारी यांना आपलं शिकार बनवलं आहे. सेक्स व्हिडीओ, अश्लिल चॅट तसेच  ब्लॅकमेलिंग करण्यात आल्याचे इतर पुरावे टोळीतील सदस्यांच्या लॅपटॉप आणि मोबाइलमधून हस्तगत करण्यात आले आहेत.

या ब्लॅकमेलिंग सेक्स स्कॅण्डलचा खुलासा झाल्यानंतर महिलांकडून चालवण्यात येणाऱ्या या रॅकेटमागे नेमकं कोण आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोणाला आपलं शिकार करायचं हे यांना कोण सांगत होतं ? अशीही विचारणा होत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीच्या हाती एक यादी लागली आहे. यामध्ये मत्स्यपालन, कृषी, उद्योग, वन, जलसंधारण, जनसंपर्क सहित इतर वेगवेगळ्या खात्यांमध्ये काम केलेल्या १३ आयएएस अधिकाऱ्यांची नावे आहेत.

या सेक्स ब्लॅकमेलिंग रॅकेटच्या म्होरक्याने एका सरकारी डायरीच्या पानांवर ‘हिट लिस्‍ट’ तयार केली होती. तपासाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, टार्गेट लिस्टमध्ये सहभागी अधिकाऱ्यांच्या नावापुढे खूण करण्यात आली असून कोड वर्ड भाषेत काहीतरी लिहिण्यात आलं आहे. काही अधिकाऱ्यांच्या नावांना गोल करण्यात आलं आहे. तर काही अधिकाऱ्यांच्या नावापुढे महत्त्वाचं आणि ओके असं लिहिलं आहे. तपास अधिकारी कोड वर्डमध्ये नेमकं काय लिहिलं आहे याची माहिती मिळण्याचा प्रयत्न करत आहेत.

आतापर्यंत किती अधिकारी या तरुणींच्या जाळ्यात अडकले याची पूर्ण माहिती मिळवत असल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणींच्या मोबाइलमधून काही व्हिडीओ मिळाले आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, “जाळ्यात अडकलेल्या अधिकाऱ्यांची व्हिडीओच्या माध्यमातून ओळख पटवली जात आहे. त्यांचा हुद्दा आणि ज्येष्ठता लक्षात न घेता त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात येणार आहे”.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!