AIMIM : आमदार वारीस पठाण यांच्यासह मुंबईच्या चार उमेदवारांची यादी घोषित

एमआयएमचे प्रमुख असाउद्दीन ओवेसी यांनी आज, सोमवारी रात्री १० च्या दरम्यान विधानसभा निवडणुकीसाठीची एमआयएम उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. प्रामुख्याने मुंबईतील विधानसभा मतदार संघातील हे उमेदवार असून अनेकांना दुसऱ्यांचा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.
दरम्यान एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खा. इम्तियाज जलील यांनी यापूर्वी महाराष्ट्रातील ७ उमेदवारांची यादी या पूर्वीच घोषित केली आहे तर आता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. असाउद्दीन ओवेसी यांनी स्वतः मुंबईतील उमेदवारांची पहिली यादी घोषित केली आहे.
यामध्ये रत्नाकर दावरे – कुर्ला मतदारसंघ, मोहम्मद सलीम खुरेशी – वांद्रे पूर्व मतदारसंघ, शाहवाझ सरफराज हुसेन शेख – अणुशक्तीनगर मतदारसंघ, वारिस पठाण – भायखळा मतदारसंघ, आरिफ मोईद्दिन शेख – अंधेरी पश्चिम मतदारसंघ