शरद पवारांनी जे राजकारण केले तेच आता राष्ट्रवादीसोबत होत आहे , देवेंद्र फडणवीस यांची टीका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया टुडे कॉनक्लेवमध्ये बोलताना शरद पवारांवर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. पवारांच्या राजकारणावर बोलताना ते म्हणाले कि , पवारांच्या राजकारणाचं युग समाप्त झालं आहे. पिढी बदलली आहे. लोकांना तोड फोडीचं राजकारण आता आवडत नाही. नवी पिढी आमच्यासोबत का आहे? कारण त्यांना अभिप्रेत असलेली राजकीय भूमिका भाजपाकडून घेतली जाते म्हणून ते भाजपासोबत आहेत.
शरद पवार तुमच्यावर आरोप करतात कि , तुम्ही साखर सम्राटांना भाजपामध्ये येण्यासाठी नोटीसचे भय दाखवता, त्यावर फडणवीस यांनी शरद पवार असे राजकारण करायचे. त्यामुळे त्यांना तसे वाटते. शरद पवारांनी राजकारण करताना पक्ष बनवले, नेते कार्यकर्ते फोडले आता तेच त्यांच्यासोबत होत आहे तर ओरड कशाला करता?
शरद पवारांनी जे राजकारण केले तेच आता राष्ट्रवादीसोबत होत आहे असे फडणवीस म्हणाले. ४० वर्षात भ्रष्टाचाराचा आरोप नसलेले हे महाराष्ट्रातील पहिले सरकार आहे असे दावा फडणवीस यांनी केला.