Aurangabad : संग्रामनगर उड्डाणपुलाजवळ अज्ञात तरुणाची आत्महत्या, मृतदेहावरून गेल्या चार गाड्या आणि भटक्या कुत्र्यांनी तोडले चेहऱ्याचे लचके !!

औरंगाबाद : संग्रामनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या पूर्वेला अज्ञात तरुणाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची दुर्घटना घडली असून मृतांची ओळख पटली नाही. सदर तरुणाचा मृतदेह जवाहर नगर आणि रेल्वे पोलिसांनी विशेष पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने घाटी रुग्णालयात पाठवला आहे. सदर तरुणाच्या मृतदेहावरून चार रेल्वे गेल्यानंतर एका रेल्वेचालकाच्या निदर्शनास हि बाब आल्याने त्याने तत्काळ रेल्वे कंट्रोलला माहिती दिली. तोपर्यंत कुत्र्यांनीही मृतदेहाच्या चेहऱ्याचे लचके तोडले. त्यामुळे मृतांची ओळख पटविणे आणखीच अवघड झाले.
याविषयी अधिक माहिती अशी कि , काल बुधवारी रात्री ११.३५ वाजता रेल्वेचे एएसआय दिलीप कांबळे यांनी मला विशेष पोलीस अधिकारी श्रीमंत गोर्डे पाटील यांना फोनवरुन संग्रामनगर रेल्वेगेट जवळ रेल्वेखाली एका तरुणाने आत्महत्या केल्याचे कळविले त्यावरून त्यांच्यासह विशेष पोलीस अधिकारी अशोक सोंजे, सिद्धांत राणा व रामेश्वर घायाळ, अशोक गाडेकर (हॉटेल कामगार) यांच्या सह अंधारात रेल्वे रुळावरून अर्धा कि .मी.पायी घटना स्थळाकडे निघाले असता रेल्वे पोल क्र११६ / १-२ जवळ व संग्रामनगर रेल्वे गेटच्या पुर्वेला मृतदेह मिळून आला तेव्हा त्यांनी रेल्वे विभाग व जवाहरनगर पो.स्टे.ला घटनेबाबत कल्पना दिली.
याबाबत गोरडेपाटील यांनी कळविले कि , मृताचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे असून हि घटना जालन्याकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या नंदीग्राम गाडी ने झाली असून या विषयीची माहिती मात्र औरंगाबादहुन जालन्याकडे जाणाऱ्या अंजेठा एक्सप्रेसच्या चालकाने रेल्वे कंट्रोल ला दिली. या अपघाताची कल्पना वेळीच न मिळाल्याने सदर तरुणाच्या मृतदेहावरून तब्ब्ल ४ रेल्वेगाडया धावल्या. (नंदीग्राम, अजिंठा, देवगिरी आणि नंदीग्राम ) तसेच हि दुर्घटना घडून बराच वेळ झाल्याने अनोळखी मृतदेहाच्या चॅहऱ्याचे कुत्र्यांनी लचके काढून मृतदेह ३ फुटापर्यंत ओढीत नेला. अशा अवस्थेत सदर तरुणाचा मृतदेह आरपीएफ दिलीप कांबळे व जवाहरनगरचे पो.कॉ.शेख.आजीज यांच्या उपस्थितीत (१२ : ४५ वाजता ) घाटी रुग्णालयात पाठवला. मृतदेहाच्या खिशात चिठ्ठी किंवा ओळख पटेल अशी कोणतीही वस्तू आढळून आली नाही.