Aurangabad Crime : घरफोडी करणाऱ्यास पुण्यातून केली अटक , ४३ हजाराचा मुद्देमाल जप्त

औरंगाबाद – गेल्या ३० आॅगस्ट रोजी रात्री १०.३० वा. शरीफ काॅलनीत घराचे उघडे असलेल्या मागच्या दारातून घूसून ५४ हजारांच्या मुद्देमाल चोरुन नेणार्या चोरट्याला जिन्सी पोलिसांनी ४३ हजारांच्या मुद्देमालासहित पुण्यातून अटक केली.
सय्यद हनीफ सय्यद हबीब(२३) असे अटक आरोपीचे नाव आहे. या चोरट्याने शरीफ काॅलनीतील शे.रहीम शे.अमीर या आचार्याच्या घरातून ४३ हजारांचे सोने आणि ११हजार रु.रोख असा ऐवज चोरुन नेला होता. पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांना खबर्याकडून माहिती मिळाली की, शरीफ काॅलनीत घरफोडी करणारा इसम पुण्यात फिरतो आहे.त्यानुसार केंद्रे यांनी पीएसआय दत्ता शेळके, पोलिस कर्मचारी हनुमंत सुपेकर, हारुण शेख, धनंजय पाडळकर यांच्या पथकाला पाठवून सय्यद हनीफ ला ताब्यात घेऊन औरंगाबादेत आणले. चोरट्याने घरफोडीची कबुली दिली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दत्ता शेळके करंत आहेत