Aurangabad जिल्हा गणेश महासंघाच्या कार्यालयात श्रीं ची प्रतिष्ठापना

औरंगाबाद जिल्हा गणेश महासंघ उत्सव समितीच्या वतीने लोकसहभागातून गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून समर्थनगर येथील महासंघाच्या कार्यालयात श्री प्रतिष्ठापना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
याप्रसंगी औरंगाबाद जिल्हा गणेश महासंघाचे संस्थापक पृथ्वीराज भाऊ पवार, आमदार संजय शिरसाठ, महापौर नंदकुमार घोडेले, यांची उपस्थिती होती. औरंगाबाद जिल्हा गणेश महासंघ उत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
यावेळी पोलीस आयुक्त म्हणाले की, पुढील काळात पाणी व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे. छतावरील पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी श्री गणेश महासंघ तसेच शहरातील गणेश मंडळांनी विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन त्यांनी बोलतांना केले. यासाठी पाणी अभ्यासकांच्या मार्गदर्शनाखाली गणेश मंडळाच्या पदाधिकारी तसेच इच्छुक गणेश भक्तांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन जिल्हा गणेश महासंघाच्या सहकार्याने पोलीस आयुक्त कर्यालयाच्या वतीने करण्यात आले असून यामध्ये गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यानी सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले.
यंदाचा गणेशोत्सव अत्यंत उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने सर्वच गणेश मंडळांनी करावा असे आवाहन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले. गणेश मंडळानी आपली संस्कृती आणि परंपरा अबाधित ठेवावी असेही ते म्हणाले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत औरंगाबाद जिल्हा गणेश महासंघ उत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी केले.
यावेळी जिल्हा गणेश महासंघाचे माजी अध्यक्ष डी. एन. पाटील, राजू नरवडे, अनिल मानकापे, अनिकेत पवार, संदीप शेळके, विशाल दाभाडे, हरीश शिंदे, शिवाजी शिंदे, किशोर चव्हाण, रतन घोगते, शिवाजी लिंगायत, अमोल पाध्ये, शिवम डमाळे, कुबेर दरख, नारायण कानकाटे, अक्षय शिंदे, नितीन कदम, धीरेंद्र पवार, परमेश्वर नलावडे, प्रसिद्धी प्रमुख सचिन अंभोरे यांची उपस्थिती होती. महासंघाच्या श्री ची प्रतिष्ठापना पौराहित्य बंडूपंत पुजारी, यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन औरंगाबाद जिल्हा गणेश महासंघ उत्सव समितीचे
कार्याध्यक्ष राजेंद्र दाते पाटील यांनी केले. सचिन मिसाळ यांनी आभार मानले.