मुंबई सामूहिक बलात्कार प्रकरण : पोलीस आयुक्त म्हणतात , तपास चालू आहे , पीडितेचे कुटुंबीय मात्र आरोपींच्या अटकेवर ठाम, ” तरच ” मृतदेह ताब्यात

मुंबईच्या चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात पीडितेच्या निधन होऊन चार दिवस होत आले तरी पोलिसांकडून संशयित आरोपींच्या अटकेची कुठलीही ठोस कारवाई होत नसल्याने पीडितेच्या कुटुंबीयांनी शव-विच्छेदनास आणि मुतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे तर मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी या प्रकरणात तपस चालू असून सत्यता पडताळून पहिली जात असल्याचे महानायक ऑनलाईनच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आहे.
आज दिवसभरात या प्रकरणात दिवसभर वातावरण मुंबई आणि औरंगाबादेत संतप्त होते. राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने झालेल्या आंदोलनात मुंबईत स्वतः खा. सुप्रिया सुळे, नवाब मलिक यांनी सहभाग घेतला तर औरंगाबादेतही त्यांच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केले. दरम्यान मुंबईतील विविध पक्ष संघटना यांनीही चुनाभट्टी पोलीस ठाण्यासमोर तीव्र आंदोलन केले पण त्यातून कोणताही मार्ग निघाला नाही.
या संदर्भात महानायक ऑनलाइनच्या प्रतिनिधीने मुंबई पोलिसांशी संपर्क साधला असता पोलीस उपायुक्त झोन सहा आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या नावानिशी अधिकृत माहिती देण्यास नकार दिला. त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्याशी थेट संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कि ” हा तपासाचा भाग आहे. तपासाच्या बतीत आम्हाला जे काही तथ्य दिसेल तेवढ्या बाबी आम्ही तपासाच्या प्रगतीच्या बाबी नक्की सांगू , पण हि ती अवस्था नव्हे. सत्यता पडताळणीनंतरच आपणास माहिती सांगता येईल . ”
दरम्यान या प्रकरणात पीडितेच्या कुटुंबियांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कि , आम्हाला सीपी , डीसीपी आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून पोस्टमार्टेम करू द्या असे सांगितले जात आहे पण आरोपींना अटक केले जात नाहीत तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही. आम्ही पोलिसांना संशयितांचे सर्व पुरावे , फोन कॉल्स डिटेल्स दिले आहेत पण दिड महिना उलटूनही पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली नाही आणि आम्हाला संशयित आरोपी कोण आहेत ? हे दाखविलेही नाही. यासंदर्भात आम्ही चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना गुन्ह्याची माहिती घेण्यासाठी गेलो असताना माहिती तर दिलीच नाही उलट आम्हालाच आरोपींसारखी वागणूक देऊन पोलीस ठाण्यात येऊ दिले नाही. या शिवाय औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तर पीडितेला दाखल केल्यानंतर तिसऱ्या दिवशीच घरी घेऊन जा म्हणून सांगितले होते परंतु सामाजिक संघटनांनी आणि नेत्यांनी घाटी प्रशासनाला सांगितल्यानंतर दिड महिन्यापर्यंत आमची मुलगी मृत्यूशी एकाकी झुंज देत होती. दरम्यानच्या काळात पोलिसांनी कुठल्याही संशयितांना तडकाफडकी ताब्यात घेतले नाही आणि आम्हाला कुठलीही माहिती दिली नाही उलट आमचीच उलट तपासणी पोलीस करीत होते. त्यामुळे मुंबई पोलिसांनी तात्काळ या प्रकरणातील संशयित आरोपीना अटक करावी अन्यथा आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाहीत.