देव देव करून घराकडे परतणाऱ्या एकाच कुटुंबातील पाच ठार

देव देव करून घराकडे परतणाऱ्या भाविकांवर काळानं घाला घातला आहे. भीषण रस्ते अपघातात एकाच कुटुंबातल्या पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. मृत्युमुखी पडलेले सर्वजण सोलापुरातील चिंचपूर येथील रहिवासी होते. मंगळवारी (२७ ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद येथे ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रावणनिमित्त सोलापुरातलं चडचणे कुटुंबीय दक्षिण भारतात देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन केल्यानंतर ते सर्वजण सोमवारी (२६ ऑगस्ट) आपल्या मूळगावी परतत होते. यादरम्यान गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद पोहोचल्यानंतर त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे चिंचपूर गावात शोककळा पसरली आहे.
१.संजय अशोक चडचणे, २. राणी संजय चडचणे, ३.श्रेयस संजय चडचणे, ४. गौरेश हत्तरसंगे (वय 2 वर्षे), ५. भाग्यश्री भीमाशंकर आळगी यांचा मृतांमध्ये तर जखमींमध्ये भीमाशंकर आळगी, शिवराज संजय चडचणे यांचा समावेश आहे .