Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

डॉ . बाबासाहेब आंबेडकर स्वतः ३७० च्या विरोधात होते , जम्मू -काश्मिरातील परिस्थिती मूळ पदावर येण्याची विरोधी पक्षाने वाट पाहावी : मायावती

Advertisements
Advertisements
Spread the love

डॉ. बाबासाहेब  आंबेडकर नेहमीच देशाच्या समता, एकात्मता आणि अखंडतेच्या बाजूने राहिले आहेत. त्यामुळेच बाबासाहेबांनी कलम ३७० ची तरतूद करण्याच्या विरोधात होते. याच कारणामुळे बसपाने हे कलम हटवण्याचे समर्थन केले आहे. देशात संविधानाची अंमलबजावणी झाल्याच्या ६९ वर्षांनंतर कलम ३७० हटवण्यात आले. त्यामुळे काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती पूर्वपदावर येण्यास वेळ लागेल. त्यासाठी प्रतीक्षा करायला हवी. न्यायालयाने सुद्धा हे मान्य केले आहे. पण अशा वातावरणात विनापरवानगी काँग्रेससह इतर पक्षाच्या नेत्यांनी काश्मीरचा दौरा करणे हे केंद्र सरकार आणि राज्यपाल यांना राजकारण करण्यासाठी संधी दिल्यासारखे नाही का? तिथे जाण्यापूर्वी याचा विचार केला असता तर बरे झाले असते, असा सल्ला मायावतींनी दिला.

Advertisements

जम्मू काश्मीरातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. मात्र तणाव टाळण्यासाठी राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी विरोधी पक्षातील नेत्यांसह काश्मीरच्या दौऱ्यावर गेले होते. पण, त्यांना श्रीनगरमधून परत पाठवण्यात आले. हा दौरा म्हणजे भाजपाला राजकारणासाठी आयत कोलीत दिल्यासारखाच आहे, असे म्हणत मायावती यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!