Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भाजपा नेत़्यांचे निधन विरोधकांकडून मारक शक्तीचा प्रयोग केला जात असल्याने : खा. प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे अजब विधान

Advertisements
Advertisements
Spread the love

विरोधकांकडून मारक शक्तीचा प्रयोग केला जात असल्याने भाजपा नेत़्यांचे निधन झाल्याचा अजब दावा त्यांनी केला आहे. या विधानामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भोपाळमध्ये मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल गौर यांच्या श्रद्धांजली सभेत साध्वी प्रज्ञासिंह यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले आहेत. यापूर्वीही  साध्वी प्रज्ञासिंह यांनी अनेकदा  वादग्रस्त विधाने केली होती. मी गटार आणि तुमचे शौचालय साफ करण्यासाठी खासदार झालेले नाही असे त्यांनी म्हटले होते. तसेच लोकसभा निवडणुकी दरम्यान, त्यांनी शाहिद हेमंत करकरे यांच्यावर टीका करून महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला देशभक्त म्हटले होते.

Advertisements

साध्वी म्हणाल्या, “एकदा एका आध्यात्मिक महाजारांनी मला सांगितले होते की, सध्या भाजपाचा वाईट काळ सुरु असून यामागे विरोधकांचा हात आहे. विरोधकांकडून भाजपाविरोधात मारक शक्तीचा प्रयोग केला जात आहे. महाराजांनी सांगितलेली ही बाब मी नंतर विसरुन गेले. त्यानंतर आता आमचे वरिष्ठ नेते एकामागून एक हे जग सोडून जात असताना मला त्या महाराजांच्या विधानावर विचार करायला भाग पाडले आहे.”

Advertisements
Advertisements

दरम्यान, भाजपाने साध्वी प्रज्ञासिंह यांच्या विधानावर मौन बाळगले आहे. मध्य प्रदेशचे नेते प्रतिपक्ष गोपाल भार्गव आणि राष्ट्रीय सरचिटणीस यांनी साध्वीच्या या विधानावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. तर काँग्रेसने खासदारांच्या या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!