Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

तीन राज्यात पुरामुळे १२५ जणांचा बळी, अमीत शहा आज बेळगाव दौ-यावर

Advertisements
Advertisements
Spread the love

महाराष्ट्रासह गुजरात , कर्नाटक आणि केरळला मुसळधार पाऊस आणि पुराचा तडाखा बसला आहे. या राज्यांमध्ये १२५ हून अधिक जणांचा बळी गेलाय. महाराष्ट्रात २७, गुजरातमध्ये २२, कर्नाटकमध्ये ३५ तर केरळमधील मृतांचा आकडा ५७ वर पोहोचला आहे. हवामान विभागाने दक्षिणेतील राज्यांमध्ये पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिलाय. यामुळे लष्कराच्या बचाव पथकांना मदतकार्य वेगाने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पूरग्रस्त बेळगावची हवाई पाहणी करणार आहेत.

Advertisements

कर्नाटकमध्ये आलेल्या पुरात मृतांची संख्या २४ वरून ३५ वर पोहोचलीय. हवामान विभागाने कर्नाटकच्या समुद्र किनाऱ्यावरील सात जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढच्या ४८ तासांत जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Advertisements
Advertisements

केरळमधील मलप्पुरममध्ये शुक्रवारी दरड कोसळली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली आकडल्याने मृतांचा आकडा वाढला आहे. यामुळे केरळमधील गेल्या तीन दिवसांतील मृतांचा आकडा ५७ वर गेला आहे. कोझीकोड येथे चार आणि थ्रीसूरमध्ये शनिवारी तिघांचा मत्यू झालाय. वायनाड जिल्ह्यात ९ आणि कवलापारा येथे ६ जणांचे मृतदेह आढळून आलेत. तर पुथुमला येथे नऊ जण अद्याप बेपत्ता आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!