Aurangabad Crime : आंतरराज्यीय टोळीतील दोन आरोपी जेरबंद

औरंगाबाद- गेल्या १ आॅगस्ट रोजी गोमटेश मार्केट मधून पशुसेवा औषधालय दुकानातून ५० हजार रु रोकड नेणार्या आंतरराज्यीय टोळीतील दोघांना क्रांतीचौक पोलिसांनी जेरबंद केले.जितेंद्रकुमार मांगीलाल (२३)आणि सुजा पुनवराम(२४) दोघे रा.मालियोका जि.जालौर राजस्थान अशी अटक आरोपींची नावे आहेत.
या चोरट्यांनी पुण्यातील सेल्फ ड्राईव्ह कार कंपनीकडून कार किरायाने घेत औरंगाबादेत गेल्या१आॅगस्ट रोजी दुकान फोडले होते. घटना घडली त्यावेळेस गुन्ह्यात वापरलेली कार पुण्यातील REVV कंपनीची असल्याचे सी.सी. टि.व्ही. फुटेज पोलिसांना मिळाले हौते.त्यामुळै पोलिस तपासात गुन्हा उघंड झाला आहे.गुन्हा घडला त्यावेळी सेल्फड्राईव्ह कंपनीची कार किरायाने देण्यात आल्याचेही स्पष्ट झाले होते. कार बुक करणार्या चोरट्यांचे मोबाईल नंबर घेऊन पोलिसांनी तपास सुरु केला हौता.
गुरुवारी वरील चोरटे मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील एका हाॅटेल मधे थांबले असल्याचे चोरट्याच्या मोबाईल लोकेशन वरुन कळाले. त्यांना अटक करुन एक मोटरसायकल व दोन मोबाईल असा एक लाखांचा ऐवज जप्त केला. वरील कारवाई पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे आणि एसीपी हनुमंत भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राहूल सूर्यतळ, पीएसआय सोनटक्के, पोलास कर्मचारी सुशीला खरात, सय्यद सलीम, गोपाल सोनवणे, राजेश फिरंगे यांनी पार पाडली