लक्ष्मण माने यांच्या “वंचित आघाडी”ला काँग्रेसकडून सन्मानपूर्वक बोलणीची अपेक्षा

‘वंचित आघाडी, काँग्रेस आघाडीने जागा वाटपा संदर्भात सन्मानपूर्वक बोलणी केली नाही तर, महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी स्वतंत्रपणे निर्णय घेणार आहे’, असा इशारा महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत दिला. राज्यातील २८८ विधानसभा लढविण्याएवढी आमची शक्ती नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी निवडून येऊ अशाच जागा आम्ही लढवणार आहोत असेही माने यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी , बी. आर. एस. पी., मुस्लिम लीग या पक्षांची एकत्र गट बांधणी केली आहे. ९ ऑगस्टपर्यंत वंचित आघाडी आणि काँग्रेस आघाडीने जागा वाटपा संदर्भात सन्मानपूर्वक कोणी बोलणी केली नाही तर आम्ही स्वतंत्रपणे निर्णय घेणार आहोत. त्यानंतर आघाडीसोबत जायचे की नाही जायचे याचा निर्णय आम्ही ठरवणार आहोत. पाच ऑगस्टपासून महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी आणि इतर दोन पक्षातील इच्छुकांचे अर्ज मागवण्यात येणार आहेत. त्यानंतर उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील. नऊ तारखे नंतर उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. ज्या ठिकाणी आमची ताकद आहे, अशा ठिकाणांवर आम्ही निवडणूक लढवणार आहोत असेही माने म्हणाले .