Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राष्ट्रवादी काँग्रेसची ‘शिवस्वराज्य यात्रा’ ६ ऑगस्टपासून : जयंत पाटील

Spread the love

राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात ६ ऑगस्टला होणार असून शिवरायांच्या जन्मस्थळी शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नरपासून सुरु होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत दिली आहेही शिवस्वराज्य यात्रा ६ ते २८ ऑगस्टला राज्यातील २२ जिल्हे८० तालुके आणि ३ हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे. शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून शिवस्वराज्य सनद सादर केली जाणार असून हाच पक्षाचा जाहीरनामा महाराष्ट्रातील लोकांपर्यंत घेऊन जाणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. ‘राज्याच्या आर्थिक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहेरयतेच्या हाताला काहीच लागलेले नाहीवीजदरवाढटोलमुक्त महाराष्ट्र या घोषणाच राहिल्या आहेत‘, असा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला आहे.

या यात्रेत बेरोजगार युवकांची नोंदणी केली जाणार आहेत्यांच्या भविष्याचा विचार यातून सक्षमपणे केला जाणार आहेयुवकांच्या हाताला काम देणंराज्यातील सगळ्या थरातील व्यवस्थेला मदत करण्याची भूमिका असणार आहेअसेही जयंत पाटील यांनी सांगितलेही शिवस्वराज्य यात्रा कुठल्या पक्षाच्या विरोधात नाहीघोर फसवणूकयुवकांची निराशा यावर प्रकाश टाकण्यासाठी आणि रयतेच्या हितासाठी ही शिवस्वराज्य यात्रा असणार आहे.

महाराष्ट्रातदेशात लोकशाहीने चालतोसरंजामशाही शाहीचा काळ कधीच संपला आहेपरंतु संरजामशाहीला अपवाद होता तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातत्याकाळातही या युगपुरुषाने रयतेचे राज्य आणलेशेकडो वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थान कोट्यावधी लोकांच्या हदयात आदराचे आहेसर्व घटकांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने शिवस्वराज्याची सनद देऊन आम्ही काय देवू इच्छितो यासाठी ही सनद घेऊन जाणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!