Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : शहराच्या विविध भागात दोन महिलांवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंंंगाबाद  शहराच्या विविध भागात राहणा-या दोन महिलांना लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणा-या दोन्ही आरोपीविरूध्द संबंधीत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.

Advertisements

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी वाळुज परिसरात राहणारी २० वर्षीय महिला कॉम्युटरच्या क्लाससाठी जात होती. त्यावेळी तिची ओळख क्लासमधील गौरव जाधव (रा.९०/५, बजाजनगर, वाळुज) याच्यासोबत झाली होती. गौरव जाधव याने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून १५ मे ते ५ जुलै २०१९ या काळात विविध ठिकाणी नेवून शारीरिक संबंध प्रस्थापीत केले. पीडित महिलेने लग्नासाठी तकादा लावल्यावर गौरव जाधव याने तुझे नग्न अवस्थेतील फोटो माझ्याकडे असून तु पोलिसात तक्रार दिल्यास ते फोटो सर्वांना दाखवून तुझी बदनामी करीन अशी धमकी दिली होती. पीडित महिलेच्या तक्रारीवरून गौरव जाधव विरूध्द एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक फड करीत आहेत.

Advertisements
Advertisements

दुस-या घटनेत, जिन्सी परिसरात राहणा-या २५ वर्षीय महिलेस नासेर पठाण निसारखान (रा.जिन्सी परिसर) याने लग्नाचे आमिष दाखवून मे २०१७ ते २९ जुलै २०१९ या काळात वारंवार लैंगिक अत्याचार केला. पीडित महिलेने लग्नासाठी तकादा लावल्यावर नासेर पठाण याने पीडितेसोबत लग्न करण्यास नकार दिला. तसेच पोलिसात तक्रार दिल्यास तुला आणि तुझ्या मुलांना मारून टाकेन अशी धमकी दिली होती. पीडित महिलेच्या तक्रारीवरून नासेर पठाण निसार खान याच्याविरूध्द जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक शरद जोगदंड करीत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!