सीसीडी’चे बेपत्ता संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ यांचे पत्र मिळाले , आर्थिक संघर्षातून आत्महत्या केल्याचा संशय

VG Siddhartha, son-in-law of former Karnataka CM SM Krishna and founder-owner of Cafe Coffee Day, goes missing near Netravati river in Mangaluru; search operation under way. #VGSiddhartha #CCDFounder pic.twitter.com/i9AV8OTJDF
— TOI Mangaluru (@TOIMangalore) July 30, 2019
सोमवार रात्रीपासून बेपत्ता असलेले ‘सीसीडी’ अर्थात ‘कॅफे कॉफी डे’चे संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ यांनी बेपत्ता होण्यापूर्वी सीसीडीच्या कर्मचाऱ्यांना उद्देशून पत्र लिहिल्याचे स्पष्ट झाले आहे. या पत्रात त्यांनी त्यांच्या आर्थिक संघर्षाविषयी लिहिले असून आपले बिझनेस मॉडेल अपयशी ठरल्याचे नमूद केले आहे. ज्या लोकांचा माझ्यावर विश्वास होता त्यांचा अपेक्षाभंग केल्याबद्दल मला अतिशय वाईट वाटत असल्याचे सिद्धार्थ यांनी या पत्रात नमूद केले आहे.
पात्रात त्यांनी पुढे म्हटले आहे कि , मी दीर्घकाळ लढलो, मात्र आज मी हार पत्करली असून माझ्या एका इक्विटी पार्टनर्सचा दबाव मी आणखी सहन करू शकणार नाही. हा पार्टनर मला सतत शेअर बायबॅक करण्यासाठी दबाव टाकत आहे. हे ट्रान्झॅक्शन मी अंशत: सहा महिन्यांपूर्वी एका मित्रासोबत भांडवल उभारण्याच्या उद्देशाने केले होते, असेही सिद्धार्थ यांनी पत्रात नमूद केले आहे. इतरही ऋणदात्यांच्या मोठ्या दबावामुळे शेवटी मला हार पत्करावी लागत असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
मी माझ्या चांगल्या प्रयत्नांनंतरही फायदेशीर असे व्यवसाय मॉडेल तयार करण्यात अयशस्वी झालो. ऋणदात्यांचा आर्थिक दबाव आला. त्यानंतर मी कर्ज घेतले. मी कोणालाही फसवण्याचा विचार कधीच केला नव्हता, असेही सिद्धार्थ यांनी पत्रात म्हटले आहे. एका माजी आयकर अधिकाऱ्याने आपला छळ केल्याचेही सिद्धार्थ यांनी पत्रात नमूद केले आहे. या अधिकाऱ्याने कंपनीच्या भागभांडवलावर जप्ती आणून बिझनेस डीलही रोखण्याचे काम केले, असा आरोपही त्यांनी पत्रात केला आहे.
देशातील सर्वात मोठे कॉफी रेस्टॉरंट ‘कॅफे कॉफी डे’ अर्थात, ‘सीसीडी’चे संस्थापक व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांचे जावई व्ही. जी. सिद्धार्थ हे अचानक बेपत्ता झाले आहेत. सिद्धार्थ यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मंगळुरू पोलिसांनी तातडीनं त्यांचा शोध सुरू केला असून सर्व शक्यता तपासून पाहिल्या जात आहेत. सिद्धार्थ यांचा सोमवारी रात्रीपासून कोणाशीही संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळं पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानंतर नेत्रावती नदीवरील उल्लाल पुलावरून रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कुणीतरी उडी मारून आत्महत्या केल्याची बातमी आली. या वृत्तानंतर मंगळुरू पोलिसांनी त्या दिशेनं तपास सुरू केला आहे.