News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या

औरंगाबाद शहरात पावसाचे वातावरण पण जोरदार पाऊस नाहीच.
औरंगाबादः सामाजिक क्रांतीतून राजकीय क्रांती घडवा, एकमेकांना मतदान करुन सर्व वंचित जाती समूहांनी सत्ता काबीज करावी; अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादन, राज्यात २८८ जागा लढवण्याचा निर्धार
नाशिकः शहरात पावसाचा जोर वाढला; मुसळधार पावसाला सुरुवात
नागपूरः सूनेने घराबाहेर काढल्याने ७५ वर्षीय सासू सत्यभामा देवराव कामडी यांची विष प्राशन करून आत्महत्या; हुडकेश्वरमधील धक्कादायक घटना
नागपूरः सावत्र बापाचा १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; जरीपटक्यातील घटना
पुणेः खडकवासला धरणातून पाण्याच्या विसर्गानंतर मुठेच्या पाणी पातळीत वाढ, धरण १०० टक्के भरले; मुठा नदीत पाण्याचा विसर्ग
पुणेः प्रबोधन मंचतर्फे ‘भारतीय संविधान व अल्पसंख्याक समाज’ या विषयावर माजी केंद्रीयमंत्री आरिफ मोहंमद खान यांच्या व्याख्यानाचे आयोजन
साताराः संरक्षक भिंत कोसळून शकुंतला दादासाहेब चव्हाण (वय ६५) यांचा मृत्यू
नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंबोयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे उद्घाटन
कलम ‘३५ ए’ला हात लावाल तर जळून खाक होऊन जाल: मेहबुबा मुफ्ती
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेटटी आणि खासदार नारायण राणे यांची सदिच्छा भेट.
अकोला : दहीहांडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पातोंडा येथे गतीमंद तरुणीवर बलात्कार; आरोपी फरार.