Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Karnataka Political Drama : जेडीएस आणि काँग्रेसच्या १४ बंडखोर आमदारांना केले अपात्र घोषित

Advertisements
Advertisements
Spread the love

कर्नाटकात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्याने आता वेगळेच वळण घेतले आहे. कर्नाटकमधील एच. डी. कुमारस्वामी सरकार पडल्यानंतर आज (रविवार) विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांनी जेडीएस आणि काँग्रेसच्या १४ बंडखोर आमदारांना अपात्र घोषित केले आहे. यापूर्वी विधानसभा अध्यक्षांनी ३ आमदारांना अपात्र घोषित केले होते. काँग्रेस-जेडीएसच्या एकूण १७ आमदारांनी बंडखोरी करत पक्षांकडे राजीनामे सादर केले होते. यानंतर अल्पमतात आलेल्या कुमारस्वामी सरकारला बहुमत गमवावे लागले होते. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना उद्या (सोमवार) बहुमत सिद्ध करावे लागणार असून विधानसभा अध्यक्षांचा आजचा निर्णय अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे.

Advertisements

विधानसभा अध्यक्षांच्या आजच्या निर्णयानंतर विधानसभेत आमदारांची संख्या २०७ वर आली आहे. म्हणजेच बी. एस. येडियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १०४ आमदारांची आवश्यकता आहे. भाजपकडे स्वत:चे १०५ आमदार आहेत.विधानसभा अध्यक्षांच्या आजच्या निर्णयानंतर विधानसभेत आमदारांची संख्या २०७ वर आली आहे. म्हणजेच बी. एस. येडियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १०४ आमदारांची आवश्यकता आहे. भाजपकडे स्वत:चे १०५ आमदार आहेत.

Advertisements
Advertisements

कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी अपात्र घोषित केलेल्या बंडखोर आमदारांमध्ये रोशन बेग, आनंद सिंह, एच. विश्वनाथ, एस. टी. सोमशेखर यांचा समावेश आहे. कर्नाटक विधानसभेचा कार्यकाल २०२३ पर्यंत आहे. विशेष म्हणजे, अपात्र घोषित करण्यात आलेले आमदार विधानसभेचे पोटनिवडणूकही लढू शकणार नाहीत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!