दाम्पत्याने दरवाजाचे कुलूप व सिल तोडून घरात अतिक्रमण केले

फायनान्स कंपनीकडे गहाण ठेवलेल्या घराचे कुलूप तोडून दोघांनी अतिक्रमण केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यावरुन खाजा अकबर खान नसीर खाजा खान या दाम्पत्याविरुध्द औरंगाबाद, बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेगमपुरा परिसरातील अरब मशिदीजवळील घर खान दाम्पत्याने ए. यू. स्मॉल फायनान्स कंपनीकडे गहाण ठेऊन त्यामोबदल्यात कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड न केल्याने कंपनीने त्यांच्या घराला सिल ठोकले. मात्र, खान दाम्पत्याने दरवाजाचे कुलूप व सिल तोडून घरात अतिक्रमण केले. हा प्रकार लक्षात आल्यावर कंपनीचे रवि रामभाऊ क्षीरसागर (३३, रा. विजयनगर, सेव्हनहिल) यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास जमादार दिवटे करत आहेत.