Aurangabad : “जय श्रीराम” चे लोण औरंगाबादेतही पोहोचले !! बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कामावरून घरी जाणाऱ्या मुस्लीम तरुणास अडवून मारहाण करीत त्याला ‘जय श्रीराम’ म्हणण्यास भाग पाडल्याची घटना समोर आली आहे. शहरातील हडको कॉर्नर भागातील मुझफ्फरनगरात गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली. इम्रान पटेल (वय-२८) असे पीडित तरुणाचे नाव आहे. बेगमपुरा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, इम्रान पटेल हा शहरातील एका हॉटेलमध्ये काम करतो. गुरुवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास तो कामावरून घरी निघाला होता. शहरातील हडको कॉर्नर भागातील मुझफ्फरनगरात तो पोहोचला असता त्याला ८ ते १० तरुणांच्या टोळक्याने अडवले. त्याच्या दुचाकीची किल्ली काढून घेतली. त्याला बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर त्याला ‘जय श्रीराम’ म्हणण्यासही भाग पाडले. इम्रान याने तीन वेळा ‘जय श्रीराम’ म्हटले. त्यानंतरही टोळक्याने इम्रानला मारहाण केली.
या दरम्यान, एका हिंदू दाम्पत्याने इम्रानची टोळक्याच्या तावडीतून सुटका करत मारहाण करणाऱ्या टोळक्याला पिटाळून लावले. मध्यस्थी करणारांचे नाव गणेश भाऊ असल्याचे पीडित इम्रान ने सांगितले. ही घटना शहरात वाऱ्यासारखी पसरली. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस स्टेशनमध्ये एमआयएम पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. या घटनेमुळे शहरातील काही भागात तणाव पसरला आहे.
याबाबत बोलताना पोलीस निरीक्षक मधुकर सावंत म्हणाले कि , पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून तपास करीत आहोत .
Maharashtra: A man allegedly beaten up for refusing to chant "Jai Shri Ram" in Aurangabad. Madhukar Sawant, Police Inspector, Begampura, says, “Complaint received. Facts will be revealed after investigation completes." pic.twitter.com/Lpe0Cdlpru
— ANI (@ANI) July 19, 2019