नितेश राणेंसह १९ जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

आमदार नितेश राणे यांनी अभियंत्यावर केलेल्या चिखलफेक प्रकरणात आता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अभियंत्यावर झालेल्या चिखलफेक प्रकरणात नितेश राणेंसह १९ जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे २३ जुलैपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत असणार आहे. आमदार नितेश राणे यांच्यासह १८ कार्यकर्त्यांना आज कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले होते. दरम्यान, जिल्हा सत्र न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांच्या वकीलांचे प्रयत्न सुरु आहेत.