Aurangabad : शहर पाणी पुरवठ्यासाठी सरकार कडून महापालिकेला १६९३ कोटी – रावसाहेब दानवे

केंद्र व राज्य शासनाकडून औरंगाबाद पाणीपुरवठ्या साठी २५४० एम.एम. व्यासाच्या जलवाहिनीसाठी १६९३ कोटी रु. निधी देण्यात येत आहे. अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री तथा भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली.
शामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंती दिनी भाजपातर्फे देशव्यापी सदस्यनोंदणी सुरु करण्यात आली आहे. त्या करता दानवे शहरात आले होते. यावेळी ते म्हणाले की, औरंगाबादचे प्रमुख प्रश्न पाणी पुरवठा, कचरा प्रश्न, रस्ते प्रश्न सौडवण्यासाठी केंद्र आणि राज्यशासनाने गंभीर दखल घेतली आहे.पुढे ते म्हणाले की, औरंगाबाद शहर ही मराठवाड्याची राजधानी असून त्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी भाजपा खंबीर पाऊले उचलंत आहे.
आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून पक्ष सदस्य नोंदणी संख्या २० टक्क्याने वाढवली जाणार .तसेच पक्षातील संजय केणेकर, शिरीष बोराळकर यांच्यावर पक्ष मोठी जबाबदारी सोपवली जाणार आहे. तसेच यैत्या १० जुलै रोजी औरंगाबाद विमानसेवे करता दिल्लीत ९/१० विमान कंपन्यासोबत केंद्रीय उड्डयण मंत्री शहरातील शिष्ठमंडळाला सोबत घेऊन चर्चा केली जाणार आहे.
या पत्रकार परिषदेला राज्यमंत्री अतुल सावे, शिरीष बोराळकर आदिंची उपस्थिती होती