Mumbai : मरिन लाईन्सच्या समुद्रात दोघे बुडाले , एकाच अंत दुसऱ्याचा शोध जारी

मुंबईत मरिन ड्राईव्हवर दोन जण बुडाल्याचे घटना घडली आहे. मरिन ड्राईव्हवर उंच लाटा उसळल्या आहेत. लाटांची आनंद घेण्यासाठी गेलेल्या दोघांना लाटांनी समुद्रात ओढल्याचे सांगितले जात आहे. दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. नेव्ही आणि अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरू आहे. समुद्रात बुडालेल्या दोघांपैकी एकाचा मृतदेह सापडला आहे. जावेद खान (वय-२२) अशी मृत तरूणाची ओळख पटली आहे. बुडालेल्या दूसऱ्या तरुणाचा शोध नौदलाचे पानबुडे घेत आहेत.
या घटनेची माहिती मिळताच नौदल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून शोधकार्य सुरू केले आहे. हे दोन जण मुंबईतील कोणत्या भागातील रहिवासी आहेत, याबाबतची अद्याप माहिती समोर आली नाही. बचावपथकाने शोधकार्य सुरू केले आहे. मात्र, समुद्राला आलेल्या भरतीमुळे बचावकार्यात अडथळे निर्माण येत आहेत. ८ वर्षाचा मुलगा समुद्रात पडल्यानंतर त्याला वाचवयाला गेलेला अन्य एक तरूणही समुद्रात बुडाल्याचे सांगण्यात येत आहे.
समुद्रात उंच लाटा उसळल्यामुळे बचाव कार्यात अनेक अडचणी येत आहेत. बचाव कार्यातील एक पोलीस कॉन्स्टेबल जखमी झाला आहे. दुपारी अडीचच्या सुमारास मोठी भरती होती. त्या वेळी एक जण लाटेबरोबर वाहून गेला. त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्याने धाव घेतली. दोघेही भरतीच्या लाटांमध्ये वाहून गेले बुडालेल्यांमध्ये एका आठ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. तो बुडत असताना त्याला वाचवायला गेलेला एक तरुण देखील बुडाल्याची माहिती मिळाली आहे.
काल रात्रीपासून मुंबईत पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. यादरम्यान उंच लाटांचा आनंद घेण्यासाठी मरिन ड्राइव्हवर अनेकजण येत असतात. आज दुपारी मरिन ड्राइव्हवर फिरण्यासाठी आलेल्या दोन जण बुडाल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर पोलीस आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नौदल आणि अग्निशमन दलाकडून दोघांचाीह शोध सुरु आहे.
आज समुद्रात भरती असल्यामुळे मोठ मोठ्या लाटा उसळत आहेत. उसळणाऱ्या लाटांमुळे शोध कार्यात अनेक अडथळे येत आहेत. दुपारी दीडच्या सुमारास एक लहान मुलगा पाण्यात बुडाल्यामुळे त्याला वाचविण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीने पाण्यात उडी घेतली. मात्र तोही त्याला वाचविताना बुडाला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
Mumbai: Rescue operation underway at Marine Drive for two people who have drowned here. pic.twitter.com/aqGMG03LKb
— ANI (@ANI) July 6, 2019