Aurangabad : वामन हरि पेठे ज्वेलर्सचे ५८ किलो सोने लंपास, तिघांना बेड्या

औरंगाबाद- समर्थनगर परिसरातील वामन हरि पेठे ज्वेलर्सचे २७ कोटी ३१ लाख रु.चे ५८ किलो सोने लंपास करणार्या तिघांना आर्थिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. आरोपी मधे पेढीच्या व्यवस्थापकाचा समावेश आहे. क्रांती चौक पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल असून आरोपींना ८ जूलै पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.अशी माहिती पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले यांनी दिली.
अंकुर राणे (३१) राजेंद्र किशनलाल जैन(३९) आणि लोकेश जैन अशी अटक आरोपींची नावे आहेत. २०१७ पासून राजेंद्र जैन याने वामन हरि पेठे ज्वेलर्स कडून सोन्याचे दागिने खरेदी करण्यास सुरुवात केली.काही तोळ्यांपासून ते किलो पर्यंत राजेंद्र हा उधारीवर सोने खरेदी करंत होता.या प्रकरणात पेढी कडून उधार सोने विक्री करण्याची परवानगी नसतानाही पेढी चा व्यवस्थापक अंकुर राणे हा जैन याला उधारीवर सोने देत होता. राजेंद्र जैन हा साड्यांचा घाऊक व्यापारी असून तो वामन हरि पेठे ज्वेलर्स कडून सोने खरेदी करुन मन्नपुरम गोल्ड, मुथुट फायनान्स व अन्य सोने तारण कंपन्यांकडे सोने ठेवून कर्ज उचलंत होता. व करोडो रुपये वापरंत होता. या प्रकरणात आरोपी राजेंद्र जैन याने समर्थनगर परिसरात दोन फ्लॅट तीन महागड्या कार अशी संपत्ती जमवली.
सोने उधार खरेदी करण्याकरता आरोपी जैन हा पेढी चा मॅनेजर राणे याला २५ टक्के कमीशन देत होता. डिसैंबर २०१८ मधे पेठे ज्वेलर्स चे मालक विश्र्वनाथ पेठे यांनी औरंगाबाद पेढी ला भेट दिल्या नंतर त्यांना ५८ किलो सोन्याचे दागिने पेढीवर कमी असल्याचे आढळले. या प्रकरणात पेठे यांनी आरोपी राणे यास विचारले असता त्याने राजेंद्र जैन व लोकेश जैन यांना सोने विकल्याचे आढळून आले.पेठेंनी या प्रकरणाची खात्री करुन घेण्या करता आरोपी जैन याला प्रत्यक्ष भेटीसाठी बोलावले. व प्रत्यक्ष खात्री झाल्यावर पेठेंनी पोलिसआयुक्त चिरंजीवप्रसाद यांच्याशी संपर्क साधला. या प्रकरणात पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले यांना लक्ष घालण्याचे आदेश दिल्यावर नवले यांनी प्रकरणाची शहानिशा केली.
एक महिन्यापूर्वी आरोपी जैन याच्याशी नवलेंनी संपर्क साधला असता. त्याने थाप मारली की लोकसभा निवडणूकीच्या धामधूमीत त्याची रोकंड ईडी आणि सी.बी.आय. ने धाड टाकून जप्त केली.व सध्या आपण रायपूर छत्तीसगड येथे आहोत असे सांगितले. जैन थापा मारंत असल्याचे नवले यांनी फिर्यादीला सांगताच येताच २० जून रोजी पेठे यांनी तक्रार दिली.
पोलिस निरीक्षकश्रीकांत नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय. सुभाष खंडागळे, प्रकाश काळे, सुनिल फेपाळे, गणेश शिंदे यांनी सापळा रचून समर्थनगरातील राम मंदीरा समोरील जयगोपाल अपार्टमेंट मधून आरोपी राजेंद्र जैन आणि लोकेश जैन या दोघांना अटक केली.तसेच अंकुर राणेलाही बेड्या ठोकल्या.
राणेनी बनविली खोटी बिले…….
दुकानातील कर्मचारी शंकर माळी यांनी पेठेंशी संपर्क साधत दागिने अजूनही मिळाले नाहीत असे सांगितले होते. त्यामुळे एप्रिल २०१९ मध्ये मालक पेठे पुन्हा शहरात आले. यावेळी देखील त्यांनी सोन्याच्या दागिन्यांबाबत राणेकडे चौकशी केली. त्यावेळी मात्र, राणेने आपल्याकडून मोठी चुक झाली. जैनला दिलेल्या दागिन्यातून आपल्याला २५ टक्के हिस्सा मिळणार होता. त्यामुळे त्याला दुकानातील दागिने टॅग काढून दिल्याचे सांगितले. तसेच ४६६ बनावट बिले तयार केल्याची कबुली देखील त्याने पेठे यांना दिली.
राणेचा विश्वास संपादन केला……
सुरूवातीला जैनने दुकानातून थोड्या-फार प्रमाणात दागिने खरेदी केले. त्याने राणेचा विश्वास संपादन करण्यासाठी सुरूवातीला दागिन्यांचे पैसे दिले. मात्र, त्यानंतर त्याने राणेला आमिष दाखवत किलोने सोने लांबविले. हे सोने त्याने फायनान्स कंपनीत तारण ठेऊन त्यावर कर्ज उचलले. या कर्जाच्या रकमेतून मौजमजा केली.
जैनने मारल्या पेठेंना थापा……
दागिने परत मिळविण्यासाठी पेठेंनी जैनशी एप्रिल २०१९ मध्ये संपर्क साधला होता. तेव्हा त्याने भाचीच्या लग्नासाठी रायपुरला दागिने घेऊन आलो आहे असे सांगितले होते. त्यानंतर पुन्हा त्याच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यावेळी त्याने आपल्याकडे कोट्यावधीने काळा पैसा आहे. हा पैसा लोकसभा निवडणुकीदरम्यान आयकर विभागाच्या अधिका-यांनी पकडला आहे. हा पैसा मिळाल्यावर दागिन्यांची रक्कम देतो असेही जैन म्हणाला.
कारच्या डिक्कीतील पैशांचा फोटो पाठवला…..
लोकसभा निवडणुकीच्या वेळी रायपुरहून येताना अधिका-यांनी गाडी पकडली. त्यात कोट्यावधींची रक्कम होती असे सांगत जैनने कारच्या डिक्कीतील पैशांचा फोटो पेठेंना व्हाटसअपवर पाठवला. त्यामुळे काही काळ पेठेंना संशय आला नाही. मात्र, जैन नेहमीच थापा मारत असल्याने त्यांनी अखेर पोलिसांची मदत घेतली.
पेठेंची पोलिसात तक्रार…..
जैनने ५८ किलो सोने लंपास केल्याचे लक्षात आल्यावर पेठेंनी पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा पोलिस आयुक्तांनी त्यांना आयकर विभागाचे अधिकारी निवडणुकीच्या काळात अशा कारवाया करत नसल्याचे सांगितले. त्यावरुन पेठेंचा विश्वास बसला. त्यानंतर त्यांनी फसवणुकीची तक्रार दिली. हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आले. प्रकरणाचा तपास करत निरीक्षक श्रीकांत नवले, सहायक फौजदार सुभाष खंडागळे, जमादार प्रकाश काळे, कारभारी गाडेकर, गणेश शिंदे, सुनील फेपाळे, नितीन देशमुख, नितीश घोडके, जयश्री फुके आणि जयश्री म्हस्के यांनी तिघांना बुधवारी रात्री पकडले.