Congress : अध्यक्षपदाचा राजीनामा देताच राहुल गांधी यांनी बदलली ट्विटरवरील नोंद

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकांटवरील प्रोफाइलमध्ये बदल करत अध्यक्ष असल्याची नोंद हटवली आहे. यामुळे राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा आपण अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याचं स्पष्ट केलं आहे. राहुल गांधी यांनी अध्यक्षच्या जागी काँग्रेसचे सदस्य असल्याचं लिहिलं आहे. राहुल गाधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून आठवड्याभरात नव्या अध्यक्षांची निवड केली जाईल असे संकेत दिले आहेत. मी आता काँग्रेस अध्यक्षपदावर नसून पक्षाच्या कार्यकारी समितीने तातडीने बैठक बोलवून नव्या अध्यक्षाची निवड करावी असे राहुल गांधी यांनी बुधवारी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांना काँग्रेस अध्यक्षपदावरुन दूर व्हायचा निर्णय घेतला. पण त्यांनी राजीनामा देऊ नये अशी काँग्रेसच्या नेते, पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. मी आधीच राजीनामा दिला असून आता काँग्रेसचा अध्यक्ष नाही. कार्यकारी समितीने लवकरात लवकर नव्या अध्यक्षाची निवड करावी असे राहुल पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
राहुल गांधी यांची २०१७ साली काँग्रेस अध्यक्षपदावर निवड झाली होती. लोकसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन २५ मे रोजीच्या पक्षाच्या बैठकीत त्यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव सादर केला. काँग्रेसच्या कार्यकारी समितीने एकमताने त्यांचा राजीनामा फेटाळला. त्यानंतर काँग्रेसच्या अनेक मोठया नेत्यांची त्यांची भेट घेऊन राजीनाम्याच्या निर्णयावरुन मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण राहुल गांधी आपल्या निर्णयावर ठाम आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त ५२ जागा जिंकता आल्या. २०१४ च्या तुलनेत काँग्रेसच्या फक्त आठ जागा वाढल्या.