Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : कामाख्या एक्सप्रेसचे ११ डबे रूळावरून घसरले, बचाव कार्य जारी ….

Spread the love

भुवनेश्वर : ओडिशात पुन्हा एकदा रेल्वेचा मोठा अपघात झाला आहे. याठिकाणी बंगळुरू-आसाम या मार्गावरील कामाख्या एक्सप्रेसचे ११ डबे रूळावरून घसरले आहेत. चौद्वार परिसरातील मंगुली पेसेंजर हॉल्टजवळहा अपघात घडल्याचे वृत्त आहे. सध्या रेल्वेने याठिकाणी रेस्क्यू ऑपरेशनसाठी एनडीआरएफ आणि मेडिकल पथके पाठवण्यात आले असून बचाव कार्य जारी असल्याचे सांगण्यात येत आहे.

ईस्ट कोस्ट रेल्वेच्या खुर्दा विभागात ही घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही तर प्रवासी जखमी झाले नाहीत. रेल्वे अधिकाऱ्यांनी अपघाताची पुष्टी केली आणि माहिती देताना सांगितले की, आज रविवारी सकाळी 11:54 वाजता ईस्ट कोस्ट रेल्वेच्या खुर्दा रोड विभागातील कटक-नारागुंडी रेल्वे विभागात ही घटना घडली.

एसएमव्हीटी बेंगळुरू-कामाख्या एसी सुपरफास्ट एक्स्प्रेस (12551) बेंगळुरूहून गुवाहाटीच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मदत आणि बचावकार्य सुरू केले. अपघातग्रस्त रिलीफ ट्रेन आणि मेडिकल रिलीफ ट्रेनही तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आली. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. रेल्वेने प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी एक हेल्पलाइन क्रमांक – 8991124238 जारी केला आहे.

माध्यमांच्या माहितीनुसार ओडिशाच्या कटकमधील चौद्वारजवळ बंगळुरू-कामाख्या सुपरफास्ट एक्सप्रेस रूळावरून खाली घसरली. या ट्रेनचे ११ डबे घसरल्याने नीललाच एक्सप्रेस, धौली एक्सप्रेस, पुरूलिया एक्सप्रेसचा मार्ग बदलण्यात आला आहे. घटनास्थळावर बचाव कार्य आणि प्रशासन हजर आहे. मेडिकल टीम, एनडीआरएफसोबतच अग्निशमन दलाचे कर्मचारीही रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभागी आहेत. याठिकाणी अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षित त्यांच्या ठिकाणांवर पोहचवण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे.

सर्व प्रवासी सुरक्षित ….

ईस्ट कोस्ट रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अशोक कुमार मिश्रा म्हणाले की, आम्हाला कामाख्या एक्सप्रेसचे काही डबे रूळावरून घसरल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तातडीने तिथे बचाव पथके पाठवण्यात आली आहे. या दुर्घटनेत कुणीही जखमी असल्याची माहिती नाही. सर्व प्रवाशी सुरक्षित आहेत. याठिकाणी रेस्क्यू ट्रेन, आपत्कालीन आरोग्य सुविधा पाठवण्यात आली आहे असं त्यांनी सांगितले. तसेच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहचत आहेत. या दुर्घटनेच्या तपासानंतर हे कसे घडले हे समोर येईल. आमचे पहिले प्राधान्य या मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरळीत करणे आणि प्रवाशांना सुखरूप त्यांच्या ठिकाणावर पोहचवणे हे आहे असल्याचे रेल्वेने म्हटले आहे. दरम्यान, ओडिशातील रेल्वे दुर्घटनेची मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांनीही माहिती घेतली आहे. ओडिशात १२५५१ कामाख्या एक्सप्रेसचा अपघात झाल्यानंतर आम्ही ओडिशाचे मुख्यमंत्री, तिथलं सरकार आणि रेल्वेच्या संपर्कात आहोत असे त्यांनी म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!