Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsUpdate : मोठी बातमी ! पाकिस्तानात बलोच आर्मीकडून ‘जाफर एक्सप्रेस हायजॅक’; प्रतिकार करणारे 6 जवान ठार !!

Spread the love

नवी दिल्ली : लाहोर : बलुचिस्तानमधील बलुचिस्तानमध्ये बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) ने जाफर एक्सप्रेसचे अपहरण केले आहे. एवढेच नाही तर बलुच आर्मीने ट्रेनमधील सर्व प्रवाशांना ओलिस ठेवले आहे. बलुच लिबरेशन आर्मीने सोशल मीडियावर ट्रेन अपहरणाची माहिती दिली. दरम्यान ‘जर लष्करी कारवाई सुरू झाली तर ओलिसांना मारले जाईल’. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे आणि दहशतवाद्यांवर कारवाई सुरू केली आहे.

जाफर एक्सप्रेस पाकिस्तानच्या नैऋत्य बलुचिस्तान प्रांतातील क्वेट्टा येथून खैबर पख्तूनख्वा येथील पेशावरला जात असताना ही घटना घडली. बलुच लिबरेशन आर्मीने सोशल मीडियावर एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, ही कारवाई मश्काफ, धादर, बोलान येथे करण्यात आली. जिथे त्याच्या सैनिकांनी रेल्वे ट्रॅक उडवून दिला. यामुळे जाफर एक्सप्रेस थांबवावी लागली आणि ट्रेन नियंत्रणात आणण्यात आली.

बलुच लिबरेशन आर्मीच्या म्हणण्यानुसार, सर्व प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आले होते. बीएलएने धमकी दिली आहे की जर पाकिस्तानी सैन्याने कोणत्याही लष्करी कारवाईचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम गंभीर होतील आणि सर्व ओलिसांना मारले जाईल. या हत्यांची जबाबदारी पूर्णपणे लष्कराची असेल.

६ सुरक्षा कर्मचारीही शहीद….

बलुच लिबरेशन आर्मीने सांगितले की, हे ऑपरेशन माजिद ब्रिगेड, एसटीओएस आणि फतेह स्क्वॉड संयुक्तपणे करत आहेत. कोणत्याही लष्करी घुसखोरीला तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर दिले जाईल. आतापर्यंत सहा लष्करी जवानांचा मृत्यू झाला आहे आणि शेकडो प्रवासी ताब्यात आहेत. या कारवाईची संपूर्ण जबाबदारी बलुच लिबरेशन आर्मी घेते.

दहशतवाद्यांनी ट्रेनवरही गोळीबार

पाकिस्तानी वाहिनी समा टीव्हीनुसार, जाफर एक्सप्रेसवर जोरदार गोळीबार झाला आहे. सुरुवातीच्या वृत्तांचा हवाला देत, वाहिनीने म्हटले आहे की गोळीबारात ट्रेन चालक जखमी झाला आहे. याशिवाय काही प्रवासी जखमीही झाले आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, ट्रेनच्या ९ डब्यांमध्ये सुमारे ५०० प्रवासी प्रवास करत होते.

बलुचिस्तान सरकारचे प्रवक्ते शाहिद रिंद यांनी जाफर एक्सप्रेसवर गोळीबार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. रेल्वे नियंत्रक मुहम्मद काशिफ म्हणाले की, प्रवासी आणि कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरकारी निवेदनानुसार, सिबी रुग्णालयात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. दुसरीकडे, रुग्णवाहिका आणि सुरक्षा कर्मचारीही घटनास्थळी पोहोचत आहेत.

बलुच लिबरेशन आर्मी

बलुचिस्तानात अनेक फुटीरतावादी गट सक्रिय आहेत. त्यामध्ये बलुच लिबरेशन आर्मीचाही समावेश आहे. ही एक फुटीरतावादी संघटना आहे, जी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करत आहे. ही संस्था २००० च्या सुमारास स्थापन झाली. बीएलए सतत पाकिस्तानी सैन्याला आणि चीनसोबत पाकिस्तानात सुरू असलेल्या प्रकल्पांना लक्ष्य करत आहे.

पाकिस्तानने त्याला बंदी घातलेली संघटना घोषित केली आहे. याशिवाय अमेरिका आणि ब्रिटनसह अनेक पाश्चात्य देशांनीही याला दहशतवादी संघटना घोषित केले आहे. बीएलए सध्या बशीर झेबच्या नेतृत्वाखाली आहे.

पाकिस्तानी प्रवाशांच्या ट्रेनचं अपहरण केल्यानंतर बीएलए आर्मीने गंभीर इशारा देखील दिला आहे. पाकिस्तानी सैन्याने कुठलंही पाऊल उचलल्यास किंवा कारवाई केल्यास ट्रेनमधील सर्वच प्रवाशांना ठार करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे बलूच आर्मीने अपहरण केलेल्या जाफर एक्सप्रेसमध्ये पाकिस्तानी सैन्य, पोलीस, आतंकवादी विरोधी दल, आयएसआयचे अधिकारी प्रवास करत होते. दरम्यान, या ऑपरेशनदरम्यान बीएलए आर्मीने ट्रेनमधील महिला, लहान मुले आणि बलूच प्रवाशांना सोडून दिले आहे. बीएलएचे फियादीन युनिट, मजिद ब्रिगेड या मिशनला लीड करत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!