Champions trophy-2025 : India vs New Zealand : दमदार खेळात चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाकडून न्यूझीलंडचा पराभव

नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाने बलाढ्य न्यूझीलंडचा पराभव केला आहे. अख्खा न्यूझीलंडचा संघ वरूण चक्रवर्तीच्या जाळ्यात फसला आहे. कारण या वरूण चक्रवर्तीने या सामन्यात पाच विकेट घेतल्या आहेत. तर कुलदीप यादव 2, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल आणि हार्दिक पड्या या खेळाडूंनी प्रत्येकी एक विकेट घेतली आहे. या फिरकी गोलंदाजीच्या बळावर टीम इंडियाने 205 धावात न्यूझीलंडला रोखले आहे. त्यामुळे टीम इंडियाने 45 धावांनी न्यूझीलंडचा पराभव केला आहे.
टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड समोर 249 धावांचे आव्हान ठेवले होते. त्यामुळे या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नव्हती. कारण हार्दिक पंड्याच्या चेंडूवर रवींद्र (६) अक्षर पटेलने झेलबाद झाला. त्यानंतर दुसरा सलामीवीर विल यंग (२२) देखील वरुण चक्रवर्तीने बाद केला. यामुळे न्यूझीलंडचा धावसंख्या २ बाद ४९ धावा झाला.
या विकेटनंतर अनुभवी फलंदाज केन विल्यमसन आणि डॅरिल मिशेल यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी केली.पण डॅरिल मिशेलचा डाव चायनामन कुलदीप यादवने संपवला. त्यानंतर रवींद्र जडेजाने टॉम लॅथम (१४) ला एलबीडब्ल्यू बाद करून भारताला चौथे यश मिळवून दिले. तथापि, या सर्वांमध्ये, केन विल्यमसन क्रीजवर राहिला आणि त्याने ७७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
एकीकडे विल्यम्सनने न्यूझीलंडचा डाव एका बाजूने भक्कमपणे सांभाळला होता.तर दुसऱ्या बाजूला एका मागून एक विकेट पडत होते. यावेळी मैदानावर आलेला ग्लेन फिलिप्सला वरूण चक्रवर्तीन फिरकीच्या जाळयात ओढत एलबीडब्ल्यू केलं. त्यानंतर ब्रेसवेल, मिशेल सँटनर आणि मॅट हेन्रीला देखील वरूणने पव्हेलियनचा रस्ता दाखवला.
सामन्यात एक वेळ अशी आली होती विल्यम्सन एकहाती सामना जिंकून देईल अशी परिस्थिती होती. पण अक्षर पटेलने त्याला फिरकीच्या जाळ्यात ओढत 81 धावांवर बाद केले.त्यानंतर सँटनरने विजयासाठी मोठे प्रयत्न केले पण टीम इंडियाच्या गोलंदाजीसमोर त्याचा निभाव लागला नाही आणि त्याचाही विकेट पडला.अशाप्रकारे टीम इंडियाने न्यूझीलंडला 205 धावात रोखले.
वरूण चक्रवर्तीने या सामन्यात पाच विकेट घेतल्या आहेत. तर कुलदीप यादव 2, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल आणि हार्दिक पड्या या खेळाडूंनी प्रत्येकी एक विकेट घेतली आहे.
भारताचा प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, मोहम्मद शमी.
न्यूझीलंडचा संघ: विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, काइल जेमिसन, विल्यम ओ’रोर्क.