Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी , १८ जणांचा मृत्यू ,घटनेचे कारण आले समोर ….

Spread the love

नवी दिल्ली : शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाली. या अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये ९ महिला, ४ पुरुष आणि ५ मुले आहेत. यापैकी सर्वाधिक ९ जण बिहारमधील, ८ दिल्लीतील आणि एक हरयाणातील आहेत. ही घटना रात्री १० वाजताच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक १३ आणि १४ वर घडली. प्रयागराज महाकुंभाला जाण्यासाठी हजारो भाविक स्टेशनवर जमले होते आणि ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी ही घटना घडली, अचानक घडलेल्या घटनेमुळे मोठा गोंधळ उडाला. पण, चेंगराचेंगरी नेमकी कशामुळे झाली. रेल्वेस्टेशनवर कोणी अफवा पसरवली होती का? याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

नवी दिल्लीरेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी आहेत. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करत, नवी दिल्लीरेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे व्यथित झाल्याचे म्हटले आहे.

दरम्यान रेल्वे प्रशासनाने चेंगराचेंगरी प्रकरणात अपघातग्रस्तांना भरपाई जाहीर केली आहे. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची भरपाई दिली जात आहे. तर गंभीर जखमींना अडीच लाख रुपये दिले जात आहेत. याशिवाय, किरकोळ जखमींना १ लाख रुपयांची भरपाई दिली जात आहे.

दोन गाड्या लेट झाल्याने प्लॅटफॉर्मवरील वाढली गर्दी

एलएनजेपी रुग्णालयाने मृत्यूंची पुष्टी केली आहे. सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार, 14 जणांना एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेल्वे स्थानकावरील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून मदतकार्य सुरू आहे. प्रयागराजकडे जाणाऱ्या दोन गाड्या लेट झाल्याने प्लॅटफॉर्मवरील गर्दी वाढली.

केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी डाक्टर आणि अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली असून त्यांना काही निर्देश दिले आहेत. दिल्लीतील मुख्य सचिवांनी वेगवेगळ्या रुग्णालयात मोठी वैद्यकीय टीम तैनात केली आहे.

चौकशीसाठी रेल्वेकडून कमीटी तयार….

यासंदर्भात बोलताना रेल्वे बोर्डाच्या माहिती आणि प्रसिद्धी विभागाचे कार्यकारी संचालक दिलीप कुमार म्हणाले, “आज सायंकाळच्या सुमारास नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रवाशांची संख्या नेहमीपेक्षा खूप अधिक होती. यामुळे रेल्वेने नियमित गाड्यांसह विशेष गाड्या चालवल्या. काही वेळासाठी प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली, यामुळे काही लोक बेशुद्ध पडल्याची माहिती मिळाली. त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या परिस्थिती सामान्य आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार आणि आरपीएफ डीजी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यासाठी दोन सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

यामुळे झाली चेंगराचेंगरी

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीचे नेमकी कशामुळे झाली याचे कारण अजूनही समोर आलेले नाही. दरम्यान आता याबाबतची एक माहिती समोर आली आहे. रेल्वे विभागाने एका विशेष ट्रेनची घोषणा केली होती. या घोषणेमुळे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी दावा केला जात आहे. एका सूत्राने दिलेल्या माहितीमुसार, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील गर्दी सतत वाढत होती. परिस्थिती अशी होती की एका तासात १५०० तिकिटे खरेदी केली जात होती. महाकुंभाला जाणाऱ्या लोकांची मोठी गर्दी होती. तर प्रयागराजला जाणाऱ्या दोन विशेष गाड्या उशिराने धावत होत्या. अशा परिस्थितीत, रेल्वेने आणखी एक विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आणि प्लॅटफॉर्म क्रमांक १६ वरून निघण्याची घोषणा केली. दुसरीकडे, इतर प्लॅटफॉर्मवर वाट पाहणाऱ्या लोकांनी विशेष ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १६ वर जाण्याचा प्रयत्न सुरू केला. यावेळी ही चेंगराचेंगरी झाल्याचे समोर आले आहे.

नवी दिल्ली रेल्वे स्थानकातील चेंगराचेंगरीवरून विरोधकांचा सवाल

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुंभमेळा सुरू आहे. तेथे जाण्यासाठी शनिवारी रात्रीच्या सुमारास नवी दिल्ली रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. यामुळे येथे चेंगराचेंगरी होऊन मोठी दुर्घटना घडली. येथे झालेल्या चेंगराचेंगरीत १५ जणांचा मृत्यू झाल आहे. यात २ मुलांचाही समेश आहे. याशिवाय १० लोक गंभीर जखमी असल्याचेही समजते. प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि प्लॅटफॉर्म क्रमांक १६ जवळील एस्केलेटरजवळ ही चेंगराचेंगरी झाली. विरोधी पक्षांनी या दुर्घटनेसाठी केंद्र सरकारच्या गैरव्यवस्थापनाला जबाबदार धरले आहे.

या दुर्घटनेतील मृतांची ओळख पटली ….

दुर्घटनेतील मृतांची ओळख पटवण्यात आली असून मृतांमध्ये ५ मुलांचाही समावेश आहे. पैकी ९ जण बिहारचे, ८ लोक दिल्लीचे तर एक जण हरयाणाचा आहे.

  1. आहा देवी (वय ७९ वर्ष, बिहार)

2. पिंकी देवी (वय ४१ वर्ष, दिल्ली)

3. शीला देवी (वय ५० वर्ष, दिल्ली)

4. व्योम (वय २५ वर्ष, दिल्ली)

5. पूनम देवी (वय ४० वर्ष, बिहार)

6. ललिता देवी (वय ३५ वर्ष, बिहार)

7. सुरूची पुत्री (वय ११ वर्ष, बिहार)

8. कृष्णा देवी (वय ४० वर्ष, बिहार)

9. विजय साह (वय १५ वर्ष, बिहार)

10. नीरज (वय १२ वर्ष, बिहार)

11. शांती देवी (वय ४० वर्ष, बिहार)

12. पूजा कुमार (वय ८ वर्ष, बिहार)

13. संगीता मलिक (वय ३४ वर्ष, हरयाणा)

14. पूनम वीरेंद्र सिंह (वय ३४ वर्ष, दिल्ली)

15. ममता झा (वय ४० वर्ष, दिल्ली)

16. रिया सिंह (वय ७ वर्ष, दिल्ली)

17. बेबी कुमारी (वय २४ वर्ष, दिल्ली)

18. मनोज कुशवाह (वय ४७ वर्ष, दिल्ली)

कोण काय म्हणाले ?

पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर म्हटले आहे, नवी दिल्ली रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे व्यथित आहे. माझ्या संवेदना अशा सर्वांसोबत आहेत, ज्यांनी आपले प्रियजन गमावले. जखमीनी लवकरात लवकर बरे व्हावे, अशी मी प्रार्थना करतो. या चेंगराचेंगरीतील बाधितांना अधिकारी मदत करत आहेत.”

याच बरोबर, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, “नवी दिल्ली रेल्वे स्थानकातून वाईट बातमी. रेल्वे प्लॅटफॉर्मवर झालेल्या चेंगराचेंगरीत लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे अत्यंत दुःखी आहे. या दुःखद प्रसंगी माझ्या संवेदना, शोकाकूल कुटुंबीयांसोबत आहे. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रर्थना करतो.

दोषींवर कारवाई करावी; बसपा प्रमुख मायावती

बसपा प्रमुख मायावती यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले. मायावती म्हणाल्या की, रेल्वेच्या गंभीर निष्काळजीपणामुळे, प्रयागराज महाकुंभाला जाण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर जमलेल्या प्रचंड गर्दीत चेंगराचेंगरी झाली. यामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडले आणि जखमी झाले. ही घटना खूप दुःखद आहे. सरकारने दोषींवर कारवाई करावी आणि पीडितांना पूर्ण मदत करावी.

प्रियंका गांधींनी ट्विट करुन घटनेवर दु:ख व्यक्त केलं

काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, “नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत महिला आणि मुलांसह अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. देव मृतांच्या आत्म्यांना शांती देवो. शोकाकुल कुटुंबाबद्दल मला तीव्र संवेदना आहेत. जखमींना लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करते.

‘पुन्हा एकदा रेल्वेचे अपयश उघड झाले’: राहुल गांधी

काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. राहुल यांनी इंस्टाग्रामवर लिहिले की, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक लोकांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आणि वेदनादायक आहे. मी शोकाकुल कुटुंबांप्रती माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीची आशा करतो. या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वेचे अपयश आणि सरकारची असंवेदनशीलता अधोरेखित होते. प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता, स्थानकावर चांगली व्यवस्था करायला हवी होती. गैरव्यवस्थापन आणि निष्काळजीपणामुळे कोणालाही आपला जीव गमवावा लागू नये याची काळजी सरकार आणि प्रशासनाने घ्यावी.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!