Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

RSS News Update : महाराष्ट्र आणि दिल्लीनंतर भाजपची आता ममतांचा गड जिंकण्याची तयारी, आरएसएस सक्रिय; मोहन भागवत यांचा पुन्हा हिंदूं जागृतीचा संदेश !!

Spread the love

कोलकाता : महाराष्ट्र आणि दिल्लीनंतर भाजपची आता ममतांचा गड जिंकण्याची तयारी चालू असून त्या दृष्टीने  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सक्रिय झाला आहे. न्यायालयाच्या परवानगीने आपल्या १० दिवसीय दौ-याच्या समापन सोहळ्यात मोहन भागवत यांनी  पुन्हा एकदा हिंदूंना  जागृतीचा संदेश  संदेश दिला आहे. महाराष्ट्र-दिल्ली विधानसभा निवडणुकीत संघाने महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळेच  दोन्ही राज्यांमध्ये भाजपने पुनरागमन केले असे सांगितले जात आहे. त्यानुसार आता मोहन भागवत आणि आरएसएसचे डोळे पश्चिम बंगालवर आहेत. येथे एका रॅलीला संबोधित करताना, आरएसएस प्रमुखांनी विविधतेत एकतेवर भर दिला आणि सांगितले की,  आपल्याला हिंदू समाजाला एकत्र आणि संघटित करण्याची आवश्यकता आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी रविवारी जगाच्या विविधतेला स्वीकारण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि म्हटले की हिंदू समाजाचा असा विश्वास आहे की विविधता एकतेत आहे. वर्धमान येथील साई मैदानावर आरएसएसच्या कार्यक्रमाला संबोधित करताना भागवत म्हणाले की, हिंदू समाजात एकतेची गरज आहे आणि चांगल्या काळातही आव्हाने कायम राहतील. ते म्हणाले, “आपल्याला हिंदू समाजाला संघटित आणि संघटित करण्याची गरज आहे. समस्यांचे स्वरूप महत्त्वाचे नाही तर आपण त्यांना तोंड देण्यासाठी किती तयार आहोत हे महत्त्वाचे आहे.

अशा प्रकारे मिळाली रॅलीला परवानगी

प्रारंभी पश्चिम बंगाल पोलिसांनी रॅली आयोजित करण्यास परवानगी देण्यास नकार दिला होता. यानंतर, कोलकाता उच्च न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर ही रॅली आयोजितकरण्यात आली. यावेळी बोलताना  भागवत म्हणाले की, हा देश ब्रिटिशांनी बांधला नव्हता.  भारत एकसंध नाही, ही भावना ब्रिटिशांनी लोकांच्या मनात बिंबवली होती.

प्रतीकात्मक महत्त्व अधोरेखित केले

संघ प्रमुखांनी व्यक्ती आणि राष्ट्राच्या विकासासाठी समानता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचे महत्त्व अधोरेखित केले आणि राष्ट्रध्वजावरील ‘धम्मचक्र’ (धर्मचक्र) चे प्रतीकात्मक महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीला व्यक्तिमत्त्वाचा आदर करून आणि अत्याचारापासून मुक्तता मिळवून पुढे जाण्याची संधी मिळाली पाहिजे. भागवत म्हणाले, “लोकांनी प्रगती करावी अशी आमची इच्छा आहे आणि त्यासाठी आम्हाला स्वातंत्र्य आणि समानता हवी आहे. कोणालाही दडपले जाऊ नये. सर्वांना संधी मिळायला हव्यात आणि बंधुत्वाने लोक पुढे जातील आणि समाजात त्यांचे यश पसरवतील.”

हिंदूत्व काय आहे ?

दरम्यान हिंदूत्व काय आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला काय करायचं आहे, या मुद्द्यांवर सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाष्य केले.  सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, “अनेक अडचणी आल्या असतील, त्या ते अडथळ पार करून सर्वजण येथे उपस्थित आहेत. हा आग्रह का आहे? संघाला (RSS) काय करायचं आहे? एका वाक्यात या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल, तर संघ संपूर्ण हिंदू समाजाचं संघटन करू इच्छितो.”

आरएसएसला हिंदू समाजाचं संघटन का करायचं?

या मुद्द्यावर भाष्य करताना ते पुढे म्हणाले, “हिंदू समाजाचं संघटन का? कारण या देशाचा उत्तरदायी समाज हिंदू समाज आहे. अमृत वचन तुम्ही ऐकलं. भारतवर्ष हे केवळ भुगोल नाहीये. भुगोल छोटा मोठा होत राहतो. पण, भारत तेव्हा म्हटले जाते, जेव्हा त्याचा एक स्वभाव असतो. भारताचा एक स्वभाव आहे. त्या स्वभावासोबत आपण राहू शकत नाही, असे ज्यांना वाटले, त्यांनी त्यांचा वेगळा देश बनवला”.

भारत-पाक फाळणीवर सरसंघचालकांचं भाष्य

“स्वाभाविक हे आहे की, जे वेगळे झाले नाहीत, त्या सगळ्यांना भारत नावाचा स्वभाव हवा आहे. हा भारत नावाचा स्वभाव आजचा नाहीये. १५ ऑगस्ट १९९४७ नंतर असे नाही. तो त्यापेक्षाही प्राचीन आहे. जेव्हा जगाच्या इतिहासाने डोळे उघडले, त्याने या भूभागावर; ज्याला भुगोलामध्ये इंडो-इराणीय प्लेट म्हणतात, त्या भूभागावर राहणाऱ्या सगळ्यांमध्ये हाच स्वभाव असल्याचे बघितले”, असे मोहन भागवत इतिहासातील दाखला देत म्हणाले.

“तो स्वभाव काय आहे, जगाची विविधता स्विकारून हिंदू वाटचाल करतो. सगळ्यांची आपापली वैशिष्ट्ये असतात. हिंदूंना माहितीये की, ही वैशिष्ट्ये ज्या एका सत्याचा आविष्कार आहे, ते सत्य एकच आहे; सृष्टीच्या चराचरात तेच एक आहे, जे बदलत नाही… जे आधीही होतं, आजही आणि नंतरही राहील. तेच शाश्वत आहे. बाकी सगळं बदलत राहते. तो बदलही त्या एकाची अभिव्यक्ती असते. त्यामुळे हल्ली म्हणतात विविधतेमध्ये एकता! पण हिंदू हे जाणतो. त्याला हे समजते की, एकतेची ही विविधता आहे, वैशिष्ट्ये आहेत”, असे मोहन भागवत म्हणाले.

व्यक्ती मोठा की समाज, हा वाद इथे नाही…

“हा एकतेचा शृंगार आहे. त्यामुळे आपापल्या वैशिष्ट्यांसोबत श्रद्धेने चालत रहा. सगळ्यांच्या वेगळेपणाचा सन्मान करा. मनुष्याला व्यक्ती म्हणून जगायचं असतं, पण फक्त व्यक्तीच्या नात्याने जगायचं नाही. व्यक्ती कुटुंबासाठी आहे. कुटुंब समाजासाठी आहे. समाज मानवतेसाठी आहे. सर्व जीवन सृष्टीच्या जीवनाशी निगडित आहे. त्यामुळे पर्यावरणासोबत मैत्रही त्या स्वभावात पहिल्यापासूनच आहे. व्यक्ती मोठा की समाज, हा वाद इथे नाहीये. सगळ्यांजवळ आपापली सत्ता आहे, ती सत्ता दुसऱ्यांची सत्ता मोठी करण्यासाठी कामाला आली पाहिजे. आपण मोठे असाल, तर दुसऱ्यांनाही मोठे करा. तोच खरा मोठेपणा आहे”, मोहन भागवत म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!