Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय !!

मुंबई: मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला असून आता या प्रकरणाची सुनावणी पुन्हा नव्याने सुरू होणार असल्याचे वृत्त आहे. सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात मराठा आरक्षण कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुरूवातीपासून पुन्हा सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्यांच्यावतीने नवनियुक्त मुख्य न्यायमूर्तींना विनंती केली होती. तसेच नवीन विशेष पूर्णपीठ स्थापन करण्याचेही हायकोर्टाला साकडे घातले होते. दरम्यान या विनंतीला न्यायमूर्तींकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली पूर्णपीठ नव्याने सुनावणी घेण्यास तयार झाले आहे. सोबतच याचिकाकर्त्यांना याबाबत रजिस्ट्रारकडे नव्याने अर्ज करण्याचे ही कोर्टाने निर्देश दिले आहेत.
पुढे आलेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा नव्याने सुनावणी होणार असल्याचे निर्देश दिले असले तरी, कुठेतरी मराठा आरक्षणाची सुनावणी आता लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण याआधी ज्या मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली कोर्ट या प्रकारणी सुनावणी घेत असत ती सुनावणी जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर होती. जवळजवळ 60 टक्के ही सुनावणी पूर्ण झाल्याच्या मार्गावर होती. यात याचिका करतेच आहे युक्तिवाद झाला होता तर सरकारी वकिलांचा युक्तिवाद सुरू होता.
दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयात बदली झाल्यामुळे ही सुनावणी पुन्हा नव्याने नव्या न्यायपिठापुढे होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे हा कालावधी कुठेतरी ग्राह्य धरला जाईल. मात्र दोन्ही बाजूच्या सरकारी वकील आणि याचिकाकर्त्यांना नव्याने आपले म्हणणे मांडावे लागेल. त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय येण्यास आणखी काही महिने लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.