Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

DelhiElectionNewsUpdate : अखेर दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित

Spread the love

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम

विधानसभा निवडणुकीची अधिसूचना कधी निघणार?- 10 जानेवारी
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख- 17 जानेवारी
उमेदवारी अर्ज छाननी करण्याची तारीख- 18 जानेवारी
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख- 20 जानेवारी
मतदानाची तारीख- 5 फेब्रुवारी
निकालाची तारीख- 8 फेब्रुवारी


नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेत अखेर दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने घोषित  केल्या आहेत. येत्या 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून या मतदानाची मतमोजणी 8 फेब्रुवारीला होणार आहे आहे.  दरम्यान राज्यातील ईव्हीएम वरील आरोंपानाही निवडणूक आयोगाने उत्तर देत सर्व आरोप खोडून काढले आहे.


देशाच्या अनेक राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये अनेक रेकॉर्ड तयार झाले. अनेक नवतरुणांनी लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभाग नोंदवला. आगामी काळात देखील लोकशाही मजबूत करण्यासाठी हे टक्केवारी अधिक वाढत जाईल. किंबहुना प्रत्येक निवडणुकीनंतर ईव्हीएमवर आरोप होतच राहतात. कुठल्याही यंत्रणेनं ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही. यंत्रणात चूक असेल, वैयक्तिक चूक असेल तर दाखवा तत्काळ कारवाई करू. सोबत ईव्हीएम संदर्भातील आरोपांवर ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही असे कोर्टानेही म्हटले आहे. त्यामुळे वायरस किंवा इतर यंत्रणांनी ईव्हीएम हॅक होऊ शकते हा दावा पूर्णतः खोटा असल्याचे सांगत केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी राज्यातील निवडणुकांवरील आरोपांवर उत्तर दिले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषद मध्ये ते बोलत होते.

दिल्ली विधानसभेच्या एकूण 70 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने (आप) भाजप आणि काँग्रेसला धोबीपछाड दिला होता. या निवडणुकीत ‘आप’ने 70 पैकी 62 जागांवर विजय मिळाला होता. तर भाजपला अवघ्या 8 जागांवर विजय मिळाला होता. गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये ‘आप’ने दिल्लीत वर्चस्व राखले होते.

मतदारांची संख्या….

दिल्लीत बहुमतासाठी 36 ही मॅजिक फिगर आहे. यंदा दिल्ली आप, काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत होण्याची चिन्हं दिसत आहेत. काँग्रेस आणि ‘आप’चा मतदारवर्ग एकच असल्याने मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस दिल्लीत किती जागा लढवणार आणि त्याचा आपला किती फटका बसणार, या समीकरणांवर भाजप लक्ष ठेवून आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार दिल्ली निवडणुकीत एकूण 1.55 कोटींहून अधिक मतदार असतील. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 83,49,645 आहे, तर महिला मतदारांची संख्या 71,73,952आहे. तर तृतीय लिंगाची संख्या 1,261 आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीसोबतच निवडणूक आयोगाने दोन विधानसभा जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. उत्तर प्रदेशातील मिल्कीपूर आणि तामिळनाडूच्या इरोड जागेवर 5 फेब्रुवारीला पोटनिवडणूक होणार आहे. त्यांचा निकाल 5 फेब्रुवारीलाच येणार आहे.

ईव्हीएम हे निर्दोष उपकरण

पत्रकार परिषदेला संबोधित करताना निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, ईव्हीएम हे निर्दोष उपकरण आहे. व्हायरस ईव्हीएममध्ये प्रवेश करू शकत नाही. निवडणुकीतील पारदर्शकता ही आमची प्राथमिकता आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, ईव्हीएमशी छेडछाड करण्याच्या चर्चेला काही फायदा नाही. ईव्हीएम हॅक करता येत नाही, हे न्यायालयाने मान्य केले आहे. मात्र ईव्हीएमवर संशय निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. निवडणुकीच्या सात-आठ दिवस आधी ईव्हीएम तयार असतात. एजंटसमोर ईव्हीएम सील केले जाते. मतदानानंतर ईव्हीएम सील केले जातात. ईव्हीएममध्ये अवैध मतांची शक्यता नाही. ईव्हीएमची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आहे.

मतदार यादीत चुकीच्या नोंदी केल्याच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, आरोप ऐकून वाईट वाटते. ही ईव्हीएम निवडणूक असल्याचे सांगण्यात आले. मतदार यादीतून नावे वगळल्याची तक्रार करण्यात आली आहे. मतमोजणी संथगतीने होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवडणूक आयोगावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रश्नांची उत्तरे देणे ही आपली जबाबदारी आहे. पारदर्शकता ही आमची प्राथमिकता आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, लोकशाहीत आपला सहभाग वाढवत राहिला पाहिजे. तरुणांनी लोकशाहीत सहभाग वाढवत राहावा. लोकसभा निवडणुकीत नवा विक्रम झाला आहे. मला आशा आहे की यापुढील काळातही लोकशाही मजबूत होत राहील.

अवधेश प्रसाद यांच्या राजीनाम्यामुळे जागा रिक्त

2022 च्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचे अवधेश प्रसाद मिल्कीपूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत अखिलेश यादव यांनी त्यांना फैजाबाद (अयोध्या) मतदारसंघातून तिकीट दिले आणि त्यांनी भाजपच्या लल्लू सिंह यांचा पराभव करून निवडणूक जिंकली, त्यानंतर त्यांनी मिल्कीपूरच्या आमदारपदाचा राजीनामा दिला आणि आता या जागेवर पोटनिवडणूक होत आहे.
यूपीच्या 9 जागांवर यापूर्वीच पोटनिवडणूक झाली आहे.

याआधी यूपीच्या नऊ विधानसभा जागांवर पोटनिवडणूक झाली आहे. त्यापैकी 7 जागांवर एनडीए तर दोन जागांवर सपा विजयी झाली होती. समाजवादी पक्षाने करहल आणि सिसामाऊ जागा जिंकल्या होत्या, तर भाजपने माझवान, कुंडरकी, खैर, गाझियाबाद सदर, कटहारी आणि फुलपूर आणि आरएलडीने मीरापूर जिंकले होते. सर्वात आश्चर्यकारक निकाल कुंदर्कीचा लागला कारण ही जागा बर्के कुटुंबाची मानली जाते. यावेळी भाजपचे रामवीर सिंह यांनी कुंडर्कीमध्ये कमळ फुलवले आहे.

मिल्कीपूरमध्ये निवडणुका का झाल्या नाहीत?

माजी आमदार गोरखनाथ बाबा यांनी 2022 च्या विधानसभा निवडणुकीबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले होते. गोरखनाथ बाबांनी 2022 च्या विधानसभा निवडणुकीनंतर सपाचे अवधेश प्रसाद यांच्या विजयाबाबत ही याचिका दाखल केली होती, जी न्यायालयात प्रलंबित होती. मात्र, आता ही याचिका मागे घेण्यात आली आहे. उमेदवारांची घोषणा करताना सपाने मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघातून अवधेश प्रसाद यांचे पुत्र अजित प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, भाजपने अद्याप येथे उमेदवार जाहीर केलेला नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!